Randeep Hooda And Lin Laishram Wedding Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda Wedding: रणदीप हुड्डा आज मणिपूरमध्ये बांधणार लग्नगाठ, खास लूक करत बांधणार लग्नगाठ

Randeep Hooda And Lin Laishram Wedding Updates: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम आज मणिपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

Chetan Bodke

Randeep Hooda And Lin Laishram Wedding

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आज मणिपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत आजपासून आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरूवात करणार आहे. अभिनेता वयाच्या ४७ व्या वर्षी लग्नगाठ बांधणार आहे. मणिपूरमध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर मुंबईत रणदीप-लिनच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या हळदी समारंभातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांनी मंदिरात जाऊन पुजा- विधी केली. यावेळी रणदीपने ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता पायजमा आणि त्यावर चॉकलेटी रंगाची शाल परिधान केली होती. तर त्याची पत्नी लिन लैशरामने पिंक रंगाची साडी परिधान केली आहे. व्हिडीओमध्ये रणदीप त्याच्या पत्नीसोबत मंदिरातून बाहेर येताना दिसत आहे. सोमवारी इंफाळमधील इबुधौ मार्जिंग शांगलेन मंदिरात पुजा- विधी केली. यावेळी त्याने माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. (Bollywood)

मंदिरातून बाहेर आल्यानंतर रणदीपने माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली. ‘मी सुखी आयुष्यासाठी, जगात सर्वत्र शांती, सुख आणि इतर गोष्टींसाठी मी प्रार्थना करतो. सर्वच चिंतेत असतात, मी ही चिंतेत आहे.’ अशी प्रतिक्रिया रणदिपने दिली. रणदीप गेल्या अनेक दिवसांपासून लिनला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत सुद्धा स्पॉट झाले होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणदीप आणि लिना लग्नबंधनात अडकणार आहेत. (Bollywood Film)

रणदीपप्रमाणे लिनदेखील मनोरंजनसृष्टीत ॲक्टिव्ह आहे. लिन मणिपूरची रहिवाशी असून ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने शाहरुखच्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यासोबतच मेरी कॉम, जाने जान, रंगून, मटरु की बिजली का मंडोली सह अनेक चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे.

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच तो 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय रणदीप सय्यद अहमद अफजलच्या 'लाल रंग 2: खून चुसवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT