Indian Films in Oscar 2025 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indian Films in Oscar 2025: छाया कदम आणि रणदीप हुड्डा यांचे चित्रपट ऑस्करमध्ये दाखल; 'या' ७ भारतीय चित्रपटांचा समावेश

Oscar 2025: ऑस्कर 2025: रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि बॉबी देओल-सूर्या स्टारर तमिळ चित्रपट 'कंगुवा'ला ऑस्कर 2025 च्या यादीत स्थान मिळाले आहे. याशिवाय इतर ७ भारतीय चित्रपटही या यादीत आहेत.

Shruti Vilas Kadam

Indian Films in Oscar 2025: 97 व्या अकादमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्स 2025 चे निकाल जाहीर होण्यासाठी फक्त दोन महिने बाकी आहेत. दरम्यान, अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने यावर्षीच्या ऑस्करसाठी 323 फीचर फिल्म्सची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 7 भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत.

एकीकडे किरण राव-आमिर खानचा 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे अशा दोन हिंदी चित्रपटांना त्यात स्थान मिळाले आहे, ज्याची लोकांना अपेक्षाही नसेल. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमचा  कान फेस्टिव्हल गाजवणारा 'ऑल विई इमॅजिन एज लाईट' हा चित्रपट ऑस्कर 2025 च्या यादीत समाविष्ट झाला आहे. याशिवाय 2024 साली प्रदर्शित झालेला साऊथ स्टार सुरिया आणि बॉबी देओलचा तामिळ-हिंदी चित्रपट 'कंगुवा' या चित्रपटाचेऑस्कर 2025 च्या यादीत नाव आहे. तर, रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचे नावही या यादीत आहे. परंतु या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.

एकीकडे, 'लापता लेडीज' ऑस्करमधून बाहेर पडल्यावर चाहते दु:खी झाले आहेत, तर दुसरीकडे इतर 7 भारतीय चित्रपटांनाही ऑस्कर मिळण्याची आशा लोकांना आहे. फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी ऑस्कर 2025 मध्ये कांगुवाच्या समावेशाबाबत माहिती दिली आहे.

7 भारतीय चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सर्वोत्कृष्ट चित्र श्रेणीच्या यादीत 7 भारतीय चित्रपटांची नावे आहेत - 'कंगुवा' (तमिळ), 'आदुजीविथम: द गोट लाइफ' (हिंदी), ' संतोष' (हिंदी), 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (हिंदी), 'ऑल विई इमॅजिन एज लाईट' (मल्याळम-हिंदी), 'गर्ल्स विल बी गर्ल्स' (हिंदी-इंग्रजी) आणि 'पुतुल' (बंगाली).

हे चित्रपट अद्याप शॉर्टलिस्ट केलेले नाहीत, ते फक्त ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. ऑस्कर समितीच्या मतदानानंतरच या 207 चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाईल आणि त्यानंतर नामांकन निश्चित केले जाईल. सध्या 7 भारतीय चित्रपटांकडून चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

SCROLL FOR NEXT