Randeep Hooda And Lin Laishram Wedding Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda Lin Laishram Wedding: रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात, पारंपारिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

Randeep- Lin wedding photos: बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डाने काल गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

Chetan Bodke

Randeep Hooda And Lin Laishram Wedding Photos

बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda)ने काल गर्लफ्रेंड लिन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. यावेळी त्यांनी अगदी साध्या सिंपल आणि अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न बंधनात अडकले. रणदीप आणि लिनच्या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Bollywood)

रणदीप वयाच्या ४७ व्या वर्षी लग्नबंधनात अडकला आहे. त्यामुळे अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याला ट्रोलिंग सुद्धा सहन करावी लागत आहे. रणदीप आणि लिनच्या लग्नातील लूकबद्दल बोलायचे तर, पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला आहे. तर लिनाने मणिपूर स्टाईल कपडे परिधान केले आहे. सध्या हा लिनचा हटके लूक तुफान चर्चेत आहे. (Bollywood News)

हे फोटो शेअर करताना रणदीपने ‘आजपासून आम्ही दोघेही एक झाले आहोत.’ सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. ‘नसिरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’नाटकातून आमची पहिली भेट झाली होती. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.’ रणदीप- लिनच्या लग्नाला बॉलिवूडमधील सेलिब्रिटी मंडळी उपस्थित नव्हते. मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.

रणदीपप्रमाणे लिनदेखील मनोरंजनसृष्टीत ॲक्टिव्ह आहे. लिन मणिपूरची रहिवाशी असून ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने शाहरुखच्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यासोबतच मेरी कॉम, जाने जान, रंगून, मटरु की बिजली का मंडोली सह अनेक चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे.

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच तो 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय रणदीप सय्यद अहमद अफजलच्या 'लाल रंग 2: खून चुसवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा

Famous Actress Death : "शिवा मला तुझ्यासोबत घेऊन जा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT