Ranbir kapoor google
मनोरंजन बातम्या

रणबीर कपूरचे हे ७ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यादीच आली समोर

Ranbir kapoors upcoming films: रणबीर कपूर हा लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री मारणार आहे. 'अॅनिमल' नंतर २०२४ मध्ये एकही सिनेमा रिलीज झाला नाही, मात्र २०२५ पासून त्याच्या सिनेमांचा धडाका लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता रणबीर कपूर हा बॅालिवुड मधील एक यशस्वी अभिनेता आहे. त्याने वेळोवेळी वेगवेगळी भूमिका साकारुन आपण कौशल्याबद्ध कलाकार असल्याच सिद्ध केले आहे. रणबीर कपूरचा शेवटचा सिनेमा अॅनिमल हा होता. ह्या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आणि कोटींची कमाई केली होती. तसेच अॅनिमलला महिलांविरोधात आर्क्षेपार्ह गोष्टी दाखवल्याबद्दल विरोध देखील करण्यात आला होता. अॅनिमल हा सिनेमा 1 डिसेंबर २०२३ रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये रणबीरचा एकही सिनेमा आलेला नाही. तसेच २०२५ मध्ये सुद्धा त्याचा कोणताच सिनेमा येणार नाही. अशी माहिती मिळत आहे. आता थेट २०२६ मध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. रामायण ते धूम ४ सारख्या सिनेमासांठी रणबीर कपूर आता सज्ज आहे.

हे आहेत 'ते' सात सिनेमे

१. लव अॅंड वार

रणबीर कपूर आणि संजय लीला बंसाली पुन्हा एकदा 'लव अॅंड वार' या सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या सिनेमाचे शुटिंग सुरु असून या सिनेमाचे डायरेक्टर संजय लीला बंसाली आहेत. तसेच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा अगोदर २०२५ मध्ये रिलीज होणार होता पण काही कारणास्तव हा सिनेमा आता २०२६ मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.

२.रामायण -१

रणबीर कपूरचा बहुचर्चित सिनेमा 'रामायण १' रिलीज होण्या अगोदरच चर्चेचा विषय बनला आहे. रणबीर या सिनेमात रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये साऊथचे सुपरस्टार यश आणि साई पल्लवी महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. यश या सिनेमा मध्ये रावणच्या भूमिका दिसणार आहे. तर, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सनी देओल हनुमानच्या भूमिकेत दिसणार आहे. नमित मल्होत्रा आणि यश या दोघांनी मिळून हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. हा सिनेमा २०२६ मध्ये दिवाळीच्या वेळी रिलीज होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

३. रामायण - २

'लव अॅंड वार' आणि 'रामायण १' नंतर 'रामायण २' हा सिनेमा २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. रणबीर कपूर अगोदर 'लव अॅंड वार' ची शुटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर तो रामायण २ ची शुटिंग सुरु करणार आहे. याची शुटिंग जून २०२५ मध्ये सुरु होईल. आणि २०२५ शेवट पर्यंत ही शुटिंग पूर्ण होईल. सलग सिनेमांमुळे रणबीर कपूर सध्या व्यस्त असल्याची मीहिती मिळत आहे. रामायणच्या दुसऱ्या भागात यश आणि सनी देओल यांचा स्क्रिन टाइम जास्त असणार आहे.

४.धूम ४

सुपरहिट फिल्म 'धूम ४' ची सुपरहिट सीरिजचा चौथा सिनेमा'धूम ४' याची सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यातच रणबीर कपूर या सीरिजचा पहिल्यांदा भाग होणारआहे. सध्या हा सिनेमा राइटिंग स्टेजवर आहे. आदित्य चोपडा या सीरीजचे प्रोड्युसर आहेत. यावेळी ते धूम ४ साठी वेगळ्या दिग्दर्शकाची शोध करत आहेत.

५.अॅनिमल पार्क २

'अॅनिमल' सिमेमाने घातलेल्या धुमाकूळ नंतर त्याचा दुसरा पार्ट 'अॅनिमल २' याची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक संदीप रेड्डी वांगा हे अजून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. त्यामुळे या सिनेमाची सशुटिंग सुरु होण्यासाठी वेळ लागणार आहे. २०२९ मध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकतो.

६. ब्रम्हास्त्र २

'ब्रमास्त्र १' च्या दमदार कामगिरी नंतर 'ब्रम्हास्त्र २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हा सिनेमा आता २०३० मध्ये रिलीज होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. 'ब्रम्हास्त्र १' ला सुद्धा तीन वर्षापेक्षा अधिकचा काळ लागला होता.

७. दिग्दर्शक राजकुमार हिराणीच्या सिनेमात झळकणार

रणबीर कपूर आणि राजकुमार हिराणी यांनी अगोदर संजू सिनेमा मध्ये एकत्र काम केले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आता पुन्हा एकदा दोघ एकत्र काम करणार आहे. मात्र अजून या सिनेमाचे शीर्षक ठरले नसून या सिनेमाची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. २०२६ मध्ये या सिनेमाची शुटिंग सुरु होऊ शकते. आणि २०२८ पर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

Edited by: Priyanka Mundinkeri

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

SCROLL FOR NEXT