Ranbir Kapoor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : 'धुरंधर' अन् 'टॉक्सिक'च्या वादळाला रणबीर कपूर घाबरला? 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट पुढे ढकलली, Live दरम्यान केला मोठा खुलासा

Love & War Movie Release Postponement : रणबीर कपूरने चाहत्यांना मोठी माहिती दिली आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Shreya Maskar

रणबीर कपूर लवकरच 'रामायण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणबीर कपूरच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

रणबीर कपूरने 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाबद्दल लाइव्ह सेशनमध्ये मोठा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'रामायण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात त्याने आपला आगामी आणखी एका प्रोजेक्ट बद्दल मोठी माहिती दिली आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

रणबीर कपूरने शनिवारी त्याच्या ब्रँडच्या इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान मोठा खुलासा केला. रणबीरने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. लाइव्ह सेशन दरम्यान, रणबीरने सांगितले की, त्याचा पुढचा चित्रपट 'रामायण' असेल. 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 'रामायण' नंतर प्रदर्शित होईल.

खरंतर 'लव्ह अँड वॉर' चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये रिलीज होणार होता. मात्र आता 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग ऑक्टोबर 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'लव्ह अँड वॉर' डिसेंबर 2026 किंवा थेट 2027 मध्ये रिलीज होऊ शकतो. मात्र अद्याप 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली नाही.

'रामायण' नंतर 'लव्ह अँड वॉर' प्रदर्शित केल्याने चित्रपटाला अनेक फायदे होणार आहेत. चित्रपट स्पर्धेपासून वाचणार आहे. कारण याच दरम्यान दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहे. 19 मार्चला दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर देताना दिसणार आहे. साऊथ अभिनेता यशचा 'टॉक्सिक' आणि रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' सिनेमा या दिवशी रिलीज होत आहे. त्यामुळे 'लव्ह अँड वॉर'ने मोठ्या स्पर्धेपासून स्वतःला सुरक्षित केले आहे.

'लव्ह अँड वॉर' चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आहे.'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचा बराचसा भाग चित्रित करायचा आहे.चित्रपटात मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स आणि एरियल ॲक्शन सीक्वेन्सचे काम बाकी असल्याने 'लव्ह अँड वॉर' चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. 'लव्ह अँड वॉर' ही एक रोमँटिक लव्ह स्टोरी असल्याचे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT