मुंबई - रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) शमशेरा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या आणि लूकमध्ये दिसणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर पाहिला की रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार यामध्ये पाहायला मिळतो. हा नवा लूक पाहून रणबीरचं विशेष कौतुक चाहते करत आहेत. या मजेदार आणि अप्रतिम ट्रेलरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने त्याचा एक अनुभव सांगितला आहे.
रणबीर हा त्याच्या शमशेरा नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाला असताना त्याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. सुदैवानं मला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. फक्त गाडीची काच फुटली आहे. यापेक्षा जास्त काही नुकसान नाही अशी माहिती रणबीरने यावेळी दिली.
शमशेरा हा चित्रपट 22 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याच्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटातून रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तीरेखेचे नाव शमशेरा तर दुसऱ्या व्यक्तीरेखेचं नाव बल्ली असे असणार आहे. या टीझरमध्ये अभिनेता संजय दत्तचा देखील धमाकेदार अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. रणबीरसोबत या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
रणबीर कपूरला विचारण्यात आले की शमशेरामध्ये संजय दत्तसोबत काम करणे कसे वाटले?यावर रणबीर म्हणाला की, मला शमशेराबाबत कमालीची उत्सुकता आहे. मी संजय दत्त यांचा मोठा फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी देखील खास आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आहे. शेवटी बहुप्रतिक्षेत अशा शमशेराचा ट्रेलर प्रदर्शित होतो आहे याचा आनंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.