संजय शिरसाट खोटारडे; मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींचा निधी दिला आहे - दानवे

'आमदार संजय शिरसाट यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील ४ महिन्यांमध्ये जवळपास १० वेळा भेटलेत.'
Maharashtra Political Crisis, Sanjay Shirsat News, Ambadas Danve News
Maharashtra Political Crisis, Sanjay Shirsat News, Ambadas Danve NewsSaam TV

मुंबई : बंडखोर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील ४ महिन्यांमध्ये जवळपास १० वेळा भेटलेत. शिवाय त्यांना हजारो कोटींचा निधी दिला असून शिरसाट हे खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.(Sanjay Shirsat Latest Marathi News)

ते आज शिवसेना भवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या जिल्हाप्रमुखांच्य़ा बैठकीसाठी मुंबईत आले असता माध्यमांशी ते बोलत होते. शिरसाट यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमदारांना वेळ देत नाहीत, निधीसाठी कित्येक फोन केले तरी त्याची दखल घेतली जात नाही. मी देखील अनेक वेळा फोन फोन करायचो मात्र त्याची दखल घेतली नाही. तसंच आज तपासलं तरी आमदारांची ५० पत्र सापडतील असा आरोप त्यांनी केला होता.

तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) त्रासाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो, एखाद्यावर राग दाखवण्यासाठी आपलं घरं जाळायचं का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर आणि मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावर औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलं म्हणून आज मुंबईत आलो आहे. शिवसेना ही एक मासबेस संघटना आहे. काही लोक सेनेतून गेले म्हणून सेना संपत नाही उलट जोमाने वाढते. पक्षप्रमुख जो आदेश देतील त्यानुसार काम करणार असं ते म्हणाले.

हे देखील पाहा -

यावेळी पत्रकारांनी संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिरसाट हे खोटारटे आहेत, मागच्या ४ महिन्यात मुख्यमंत्री त्यांना १० वेळा भेटले असतील. तसंच शिरसाट हे मुळात मतदार संघात राहत नाहीत ते मुंबईला राहतात.तसंच ते स्वत: पाणी योजने संदर्भात मराठ्यातील काही कामांसाठी मुख्यमंत्र्याना भेटले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या कार्यालयाच्या उद्धाघाटना स्वत: उद्धव ठाकरे संभाजीनगरला आले होते. शिवाय त्यांना हजारो कोटींचा निधी देखील दिला असून त्याच्या माझ्याकडे त्याबाबतचा तपशिल असल्याचा दावा देखील दानवे यांनी केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com