Ranbir Kapoor google
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor:'रामायण'च्या रिलीजआधी रणबीर झाला अयोध्यावासी; राम मंदिराजवळ खरेदी केली प्रॉपर्टी, किंमत जाणून व्हाल अवाक

Ranbir Kapoor: ‘रामायण’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी रणबीर कपूरने अयोध्येत 3.31 कोटींची जमीन खरेदी केली. “अयोध्येने मला निवडलं,” असं म्हणत अभिनेत्याने खास भावना व्यक्त केल्या आहेत.

Shruti Vilas Kadam

Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. .या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या चित्रपटातील रणबीर कपूर साकारत असलेल्या प्रभू श्रीराम यांची झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. विशेष म्हणजे, चित्रपट रिलीज होण्याआधीच रणबीरने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. अभिनेत्याने अयोध्येत तब्बल 3.31 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने सुमारे 2,134 स्क्वेअर फूट जागा खरेदी केली आहे. ही जमीन राम मंदिरापासून २० मिनिटं दूर असलेल्या सरयू नदी किनारी विकसित करण्यात येत असलेल्या प्रीमियम प्रोजेक्टमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रोजेक्टमध्ये लक्झरी सुविधा असलेली घर, क्लब हाऊस आणि प्रसिद्ध हॉटेल ब्रँडची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

जमीन खरेदीबाबत बोलताना रणबीर कपूरने “माझा असा विश्वास आहे की, अयोध्येनेच माझी निवड केली आणि मी केवळ त्या हाकेला साद दिली. अयोध्या ही आपल्या इतिहासात खोलवर रुजलेली असलेल्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ‘सरयू’च्या या भूमीने माझ्यासाठी एक माध्यम म्हणून कार्य केले; ज्यामुळे ही भूमी माझ्या कुटुंबाशी सदैव जोडलेली राहील.

लवकरच, रणबीर कपूरचा आगामी ‘रामायण: पार्ट 1’ चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून, या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पहिला लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रणबीरची जोरदार चर्चा रंगली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT