Ranapati Shivray Swari Agra saam tv
मनोरंजन बातम्या

Ranapati Shivray Swari Agra : चिन्मय मांडलेकर नव्हे दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटात शिवरायांची भूमिका 'हा' अभिनेता साकारणार, पाहा VIDEO

Ranapati Shivray Swari Agra - Chhatrapati Shivaji Maharaj Role : 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटात थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराजांची एन्ट्री झाली आहे. चित्रपटात कोण शिवरायांची भूमिका साकारणार पाहूया.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे.

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची एन्ट्री झाली आहे.

चित्रपटात चिन्मय मांडलेकर नाही तर दुसरा लोकप्रिय अभिनेता महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.

सध्या सोशल मीडियावर 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय 'रणपति शिवराय स्वारी आग्रा ' या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा ' चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रला दिसणार आहे.

शिवराज अष्टकच्या सहाव्या शिवपुष्पातून चिन्मय मांडलेकरांची एक्झिट झाली असून अभिजीत श्वेतचंद्र शिवरायाची भूमिका साकारणार आहे. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला. चित्रपटातील 'महारुद्र शिवराय' गीताचे दमदार सादरीकरण यावेळी करण्यात आले. हा सोहळ्या पाहून मन भारावून गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या पोस्टला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "शिवराज अष्टकातील सहावे पुष्प...'रणपति शिवराय स्वारी आग्रा' अध्यायातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन..." या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक चित्रपटासाठी अभिजीत श्वेतचंद्रला शुभेच्छा देताना दिसत आहे. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपट 30 जानेवारी 2026 चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

O'Romeo vs Tu Yaa Main : शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' फ्लॉप की हिट? तर 'तू या मैं' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

Aadhaar Vacancy 2026: खुशखबर! 'आधार'मध्ये नोकरीची संधी; २५२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कळव्यात मोठी वाहतूक कोंडी...

Maharashtra Politics: शिंदेसेना करणार भाजपचा गेम? सत्तेचं समीकरण बदलणार, कोण किंगमेकर ठरणार?

Shocking : फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण उघड

SCROLL FOR NEXT