Ramayana Collection AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई; ५०० कोटींपासून काही पावले दूर, रविवारचं कलेक्शन किती?

'Ramayana: Rise of a Legend' Box Office Collection Day 4 : विकेंडला 'रामायण' हाऊसफुल पाहायला मिळाला. रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपचटाने चार दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रामायणाची भव्य आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणी.

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका.

'रामायण' हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

भारतीय पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) हा २०२६ मधील बहुचर्चित चित्रपट आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' हा वाल्मिकी रामायणावर आधारित चित्रपट आहे. 'रामायण' हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट दोन भागांमध्ये सादर करण्यात येणाऱ्या रामायण मालिकेतील पहिला भाग आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

अवघ्या चार दिवसांत 'रामायण' चे जागतिक स्तरावरील एकूण उत्पन्न ५०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. हा पौराणिक महाकाव्यपट भारतात २०० कोटी रुपयांच्या नेट कमाईचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. वीकेंडला रविवारी चित्रपटाने ५६.१५ कोटी रुपयांची कमाई केली. सध्या या चित्रपटाचे जागतिक स्तरावरील एकूण उत्पन्न ४९९.२० कोटी रुपये इतके झाले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, भारतातील एकूण कमाई २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर परदेशातील बाजारपेठांतून २१४ कोटी रुपयांची भर पडली आहे.

रविवारच्या कमाईमुळे पहिल्या वीकेंडचे एकूण उत्पन्न १७४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.दिवसभरातील कमाईमध्ये हिंदी आवृत्ती आघाडीवर होती, जिने १७,७१४ शोजमधून ३६.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर कन्नड आवृत्तीने ७.२५ कोटी रुपये, तेलुगू आवृत्तीने ६.२५ कोटी रुपये, तमिळ आवृत्तीने ३.१५ कोटी रुपये आणि मल्याळम आवृत्तीने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. सध्या भारतातील एकूण नेट कमाई २३८.८५ कोटी रुपये इतकी झाली आहे, तर एकूण ग्रॉस कलेक्शन २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

या चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांनी एकत्र काम केले आहे. 'रामायण' ४००० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. 'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकले आहेत. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळच्या चार शासन नियुक्त संचालकांविरोधात यलगार

Unique Fort : एका बाजूला डोंगर, तीन बाजूंनी पाणी! दोन नद्यांच्या संगमावर उभा आहे 'हा' अद्भुत किल्ला

दिवाळीच्या सणावर काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जळून खाक, ६ जणांचा होरपळून मृत्यू

Oil Price Crash : कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या

सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

SCROLL FOR NEXT