Ramayana Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! १००० कोटींच्या क्लबपासून फक्त एक पाऊल दूर

Ramayana Box Office Collection Day 19 : रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. १९ दिवसांत चित्रपटाने भारतात ९५५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Shreya Maskar

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या रणबीर कपूर आणि यश यांच्या 'रामायण: पार्ट १' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवणाऱ्या या चित्रपटाने आता कमाईचा नवा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १९ दिवसांत चित्रपटाने भारतात ९०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे.

१९व्या दिवशीही चित्रपटाची कोट्यवधींची कमाई

Sacnilk च्या आकडेवारीनुसार, 'रामायण'ने प्रदर्शनाच्या १९व्या दिवशी भारतात १२.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. या कमाईसह चित्रपटाचे एकूण भारतातील नेट कलेक्शन ९५५.४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा १,१४५.६५ कोटी रुपये आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये चित्रपटाने १,७०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

  • पहिला आठवडा : ५६४.६० कोटी रुपये

  • दुसरा आठवडा : २९९.१५ कोटी रुपये

  • १६वा दिवस : १५.७५ कोटी रुपये

  • १७वा दिवस : २६.६५ कोटी रुपये

  • १८वा दिवस : ३५.६० कोटी रुपये

  • १९वा दिवस : १२.७० कोटी रुपये

  • एकूण : ९५५.४५ कोटी रुपये

'रामायण' बद्दल

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली असून अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे.चित्रपटात अरुण गोविल, अजिंक्य देव, विवेक ओबेरॉय, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, शीबा चड्ढा, इंदिरा कृष्णन, शोभना, लारा दत्ता, आदिनाथ कोठारे आणि कुणाल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोठी स्टारकास्ट, भव्य निर्मिती आणि रामायणासारखा लोकप्रिय विषय यामुळे चित्रपटाबद्दल प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

'रामायण: पार्ट २' कधी येणार?

पहिल्या भागाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाचीही उत्सुकता लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'रामायण: पार्ट २' हा चित्रपट दिवाळी २०२८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागात कथेला कोणते वळण मिळणार आणि कलाकारांच्या भूमिका कशा असणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

'रामायण'ने ८ चित्रपटांना टाकले मागे

मीडिया रिपोर्टनुसार, तिसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० बॉलिवूड चित्रपट

  1. धुरंधर: १९.७ कोटी

  2. रामायण: १२.७० कोटी

  3. धुरंधर २: ११ कोटी

  4. छावा: ७.७४ कोटी

  5. स्त्री २: ६.७५ कोटी

  6. ॲनिमल: ५.५५ कोटी

  7. जवान: ५.४५ कोटी

  8. गदर २: ४.६ कोटी

  9. पीके: ४.४२ कोटी

  10. द केरळ स्टोरी: ४.४ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील 18 हॉटेल्सचे अन्न परवाने आणि नोंदणी FDA कडून निलंबित

Accident: सकाळी-सकाळी भयंकर अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू; ४ जणांची प्रकृती चिंताजनक

Vangyache Bharit Recipe : चुलीवर भाजलेल्या वांग्याचा खास स्वाद! हिवाळ्यात बनवा कोकण स्पेशल झणझणीत वांग्याचे भरीत

मुंबईकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर! अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत; वाचा कधीपासून सुरू होणार नवा मार्ग?

Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर पालिकेकडून हातोडा, सहाव्या दिवशी कारवाई सुरूच; नामांकित हॉटेल्सना दणका

SCROLL FOR NEXT