Ramayana  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana : 'रामायण'मध्ये तगडी स्टार कास्ट; रणबीर, साई पल्लवी ते यश, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Ramayana Cast Payment : बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मोठे कलाकार झळकणार आहेत. कोणी किती मानधन घेतले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र रणबीर कपूरच्या 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणी किती मानधन घेतले, जाणून घेऊयात.

'रामायण' चित्रपटाच्या कलाकारांचं मानधन किती?

रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'रामायण' चित्रपटात श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने तब्बल 150 कोटी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये बनत असल्यामुळे प्रत्येकी एका भागासाठी 75 कोटी रुपये फी त्याने घेतली आहे.

साई पल्लवी

साऊथ अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) 'रामायण' चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारणार आहे. 'रामायण' साठी साई पल्लवी 12 कोटींचे मानधन घेतले आहे. प्रत्येक भागासाठी 5 कोटी रुपये घेतले आहे.

यश

साऊथ अभिनेता यश (Yash) 'रामायण' चित्रपटात रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याने 'रामायण' चित्रपटाच्या एका भागासाठी 50 कोटी रुपये फी घेतली आहे.

सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) 'रामायण' चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने दोन भाग मिळून एकूण 40 कोटी रुपये मानधन घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी तब्बल 20 कोटी फी घेतली आहे.

'रामायण' बजेट किती?

रणबीर कपूर हा 'रामायण' चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाचे बजेट 1600 कोटी रुपये आहे. पहिल्या भागासाठी 900 कोटी रुपये खर्च झाले असून दुसऱ्या भागासाठी 700 कोटी शिल्लक आहेत. 'रामायण' चित्रपट भारताच्या पौराणिक महाकाव्यावर आधारित आहे. 'रामायण' चित्रपटात ॲक्शन, मायथोलॉजी आणि भव्यतेचा संगम पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

SCROLL FOR NEXT