रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. चित्रपटाच्या कमाईत मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मागील दिवसाच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत तब्बल ३७.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने जगभरातील कमाईचा आकडा १,७३५ कोटी रुपयांच्या पुढे नेला आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड'ने मंगळवारी भारतात तब्बल १७.५० कोटी रुपयांची कमाई केली. मागील दिवसाच्या तुलनेत ही कमाई ३७.८ टक्क्यांनी अधिक आहे.यामध्ये हिंदी भाषेतील शोचा सर्वाधिक वाटा होता. हिंदी व्हर्जनने १४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. तर मल्याळम भाषेतील चित्रपटाने १.२५ कोटी रुपये कमावले. कन्नड व्हर्जनने ९० लाख रुपये, तमिळ व्हर्जनने ७० लाख रुपये आणि तेलुगू व्हर्जनने ४० लाख रुपयांची कमाई केली.
16वा दिवस (शुक्रवार): रु. 15.75 कोटी
17वा दिवस (शनिवार): रु. 27.65 कोटी
18वा दिवस (रविवार): 35.60 कोटी रुपये
19वा दिवस (सोमवार): रु. 12.70 कोटी
20वा दिवस (मंगळवार): रु. 17.50 कोटी
भारतातील एकूण नेट कमाई: ९७२.९५ कोटी रुपये
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, भारतातील कमाईसोबतच परदेशातील बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची चांगली कामगिरी सुरू आहे. मंगळवारी परदेशी बाजारपेठेतून चित्रपटाने ५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचे एकूण परदेशी ग्रॉस कलेक्शन ५७३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा १,१६२.१५ कोटी रुपये झाला आहे. तर भारत आणि परदेशातील कमाई एकत्रित केल्यास चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १,७३५.१५ कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे जागतिक बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
'रामायण' तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'रामायण'ने प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशीही उत्कृष्ट कामगिरी केली. तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत केवळ वाढच झाली नाही, तर तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाने ₹१७.५० कोटी कमावले असून, 'पुष्पा २' (₹११.५० कोटी), 'केजीएफ २' (₹९.५७ कोटी), 'धुरंधर २' (₹९.५० कोटी) आणि 'बाहुबली २' (₹६.९५ कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे.