Ramayan In 80 Created World Record In 2020 Saam TV
मनोरंजन बातम्या

Ramayan World Record: ८०च्या दशकातील 'रामायण' मालिकेने केला वर्ल्ड रेकॉर्ड, बघा काय घडलंय?

Ramayan In 80s: सुनील लाहिरी यांनी लक्ष्मणची भूमिका साकारली होती.

Pooja Dange

Ramayan Video Shared Sunil Lahri: रामायण आणि महाभारत या मालिकांना आणि त्यातील कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत. 80 च्या दशकात दर रविवारी टीव्हीवर रामायण या मालिकांचे भाग प्रसारित व्हायचा. दरम्यान जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर यायची तेव्हा रस्त्यावर शांतता पसरायची. लोक पूर्ण श्रद्धेने आंघोळ करून टीव्हीसमोर बसायचे.

मालिकेतील पात्रांना प्रत्यक्षात देखील देवासारखी वागणूक मिळायची. 2020 मध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जेव्हा कोरोना काळात संपूर्ण लॉकडाऊनमध्ये अडकला होता तेव्हा मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. यावेळी 'रामायण' मालिकेतील एका एपिसोडने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला.

रामायणातील लक्ष्मण म्हणजे सुनील लाहिरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लोकांना याची आठवण करून दिली आहे. 3 वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच 16 एप्रिल 2020 रोजी रामायणाचा तो भाग प्रसारित झाला होता ज्यामध्ये लक्ष्मण आणि मेघनादचे युद्ध दाखवले होते. या एपिसोडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 77.7 दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाले. म्हणजेच तेव्हा 7.7 कोटी लोकांनी हा भाग पहिला. हा एक जागतिक विक्रम होता ठरला.

प्रेक्षकांचे आभार मानताना, रामायणात लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लाहिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, या दिवशी 16 एप्रिल 2020 रोजी, रामायणातील लक्ष्मण-मेघनाथ युद्ध प्रकरणाने एक जागतिक विक्रम रचला. जो एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला. 77.7 दशलक्ष दर्शकसंख्येबद्दल सर्वांचे आभार, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले आहे. यासोबतच त्यांनी लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील युद्धाच्या सीनची झलकही शेअर केली आहे.

या मालिकेत सुनील लाहिरी यांनी लक्ष्मणची भूमिका साकारली होती. तर विजय अरोरा मेघनाथची भूमिका साकारत होते. मालिकेतील सर्व कलाकार त्यांनी साकारलेल्या पात्रांसाठी कायमचे अजरामर झाले. काही लोक आजही अरुण गोविल यांना भगवान राम मानतात आणि त्यांना पुन्हा एकदा त्याच रूपात येण्याचे आवाहन करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

Naam Foundation: समाजसेवेचा दशकभराचा प्रवास, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम फाऊंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा संपन्न

Laxman Hake: मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य, लक्ष्मण हाकेंविरोधात बीडमध्ये गुन्हा

SCROLL FOR NEXT