Aayodhya Ram Mandir Inauguration Program Saam Tv
मनोरंजन बातम्या

अमिताभ बच्चन ते रणबीर कपूरपर्यंत, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला कोण-कोण सेलिब्रिटी जाणार?

Aayodhya Ram Mandir Inauguration Program: या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहेत. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

Priya More

Bollywood And Tollywood Celebrity:

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची (Ram Mandir Inauguration) सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमाकडे देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहेत. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना निमंत्रण पत्र देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रणदीप हुड्डापर्यंत अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. फक्त बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटी यावेळी हजेरी लावणार आहेत. हे सेलिब्रिटी कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत...

दीपिका चिखलिया -

प्रसिद्ध मालिका 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका चिखलियाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका चिखलियाला प्रथम स्थान मिळाले आहे.

अरुण गोविल -

'रामायण' मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल देखील या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

अमिताभ बच्चन -

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या खास क्षणाचे साक्षीदार असणार आहेत. बिग बी एकटे येणार की कुटुंबासह येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रणबीर कपूर-आलिया भट्ट -

राम मंदिराच्या या खास मुहूर्तावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या कपलला सोमवारीच निमंत्रण पत्र मिळाले.

कंगना रनौत -

कंगना रनौतने काही महिन्यांपूर्वी राम लल्लाचे दर्शन घेतले होते. याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. आता कंगना रनौत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाणार आहे.

जॅकी श्रॉफ आणि टायगर -

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ यांनाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची झलक पाहायला मिळाली.

रणदीप हुड्डा -

या खास क्षणाला उपस्थित राहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यालाही आमंत्रित करण्यात आले आहे. रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती शेअर केली होती. अभिनेत्याला सोमवारी वैयक्तिक आमंत्रण मिळाले होते.

रजनीकांत -

साऊथचे सुपरस्टार रजनीकांतही या खास क्षणाला हजेरी लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच भाजप नेते अर्जुन मूर्ती यांनी रजनीकांत यांना अयोध्या रामजन्मभूमीवरील कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते.

चिरंजीवी -

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता धनुष, केजीएफ स्टार यश, प्रभास, चिरंजीवी आणि ऋषभ शेट्टी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी हजेरी लावू शकतात.

अक्षय कुमार -

बॉलीवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमारलाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अक्षय कुमार नुकताच 'राम सेतू' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अनुपम खेर -

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनाही राम मंदिराचा हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.

माधुरी दीक्षित -

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा या विशेष सोहळ्याचा भाग असणार आहे.

अजय देवगण

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT