Ram Charan Saam tv
मनोरंजन बातम्या

Ram Charan: ४० व्या वर्षी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Ram Charan: तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कॅमिनेनी यांनी दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आनंदाची घोषणा केली आहे.

Shruti Vilas Kadam

Ram Charan: तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कॅमिनेनी यांनी दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आनंदाची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यात उपासनाला पाहुण्यांकडून भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले जाताना दाखवले आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “Double the joy, double the love, double the blessings”, ज्याचा अर्थ आहे – दुहेरी आनंद, दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वाद. व्हिडिओच्या शेवटी “नवीन प्रारंभ” असा कॅप्शन दिले आहे. .

राम चरण आणि उपासना यांनी २०२३ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असून, हे नाव ‘ललिता सहस्त्रनाम’ या धार्मिक ग्रंथातून प्रेरित आहे, ज्याचा अर्थ ‘आध्यात्मिक जागृती आणणारी शुद्ध करणारी ऊर्जा’ असा होतो.

नुकताच राम चरण ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसला होता. आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटातही त्याची भूमिका पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या घोषणा नंतर चाहत्यांकडून आणि मित्रांपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राम चरण आणि उपासनाला त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

SCROLL FOR NEXT