Ram Charan Shared Emotional Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Charan Shared Emotional Video : राम चरण आणि उपासनाचा कसा होता आई-बाबा होण्याचा प्रवास? क्यूट व्हिडिओ केला शेअर

Ram Charan Shares Glimpse Of Daughter : नुकताच राम चरणने पत्नी उपासनाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Charan Shares Cute Video On Upasana Birthday : राम चरण हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतला सुपरस्टार आहे. मागील महिन्यात राम चरण बाबा झाला. लग्नाच्या ११ वर्षांनंतर उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला. राम चरण नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.तो नेहमीच अपडेट शेअर करत असतो.नुकताच पत्नी उपासनाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

राम चरण आणि बायको उपासना लेकीच्या आगमनाने खूप आनंदी आहेत. काही दिवसांपूर्वी लेकीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. राम चरणच्या लेकीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असे आहे.आता बायको उपासनाच्या वाढदिवशी राम चरणने एक क्यूट व्हिडिओ पोस्ट केला आहे.

राम चरण-उपासनाचा आई-बाबा होण्याचा प्रवास

राम चरणने बायको उपासनाच्या वाढदिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओत राम चरणने आई-बाबा होण्याचा संपूर्ण ९ महिन्यांचा प्रवास सांगितला आहे. या व्हिडिओत राम चरण आणि बायको उपासनाने बाळाच्या आगमनापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

या व्हिडिओत राम चरणने उपासनासाठी गरोदरपणाचे सुरवातीचे ८ महिने जरा सोपे होते. पण नवव्या महिन्यात उपासनाला खूप त्रास झाल्याचे सांगितले. उपासनाने नवव्या महिन्यात खूप त्रास सहन केला. काही वेळा उपासना भावूकही व्हायची असंही सांगितलं.

व्हिडिओत क्लिन काराच्या जन्माचीही झलक दाखवण्यात आली. जेव्हा राम चरण मुलीला घेऊन हॉस्पिटच्या रुममधून बाहेर आला तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंदही या व्हिडिओत टिपला आहे.त्यानंतर लेकीच्या नामकरण सोहळ्याची काही दृश्ये या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. नामकरण सोहळ्यात उपासना भावूक झालेली दिसली.उपासना भावूक झाल्यावर राम चरणने उपासनाचे डोळे पुसल्याचा गोड क्षण टिपला आहे.

क्लिन काराच्या नामकरण सोहळ्याला आदिवासी समाजाच्या काही लोकांनी नृत्य केले. उपासनाने लेकीला चेंचूस या आदिवासी समाजाचा घटक होताना बघायला आवडेल असेही सांगितले. अगदी पारंपारिक पद्धतीने क्लिन काराचा नामकरण सोहळा पार पडला.

या व्हिडिओत क्लिन काराचे आजी आजोबा खूप आनंदी दिसत आहे. मेगा स्टार चिंरंजीवी यांनी लहान बाळाची आतुरतेने वाट पाहतोय असे म्हटले आहे. राम चरणच्या या व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकली आहे. व्हिडिओत बाळच्या आगमनानंतर राम चरणच्या चाहत्यांनी अनेक ठिकाणी सेलिब्रेशन केल्याचेही काही फोटो दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उप्सी(उपासना)आणि कारा एक महिन्याची झाली आहे. काराला खूप प्रेम.कारा ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट आहे'.असं कॅप्शन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT