Priyanka Chopra On Manipur Video : महिलांना मोहरे होऊ देणार नाही; मणिपूरच्या घटनेवरून अभिनेत्री प्रियांका चोप्रा भडकली

Priyanka Chopra Reacts On Manipur Violence Against Women : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा प्रियांका चोप्राने निषेद व्यक्त केला आहे.
Priyanka Chopra Reaction On Manipur incident
Priyanka Chopra Reaction On Manipur incidentSaam Tv
Published On

Priyanka Chopra Reaction On Manipur incident : महिलांवरील अत्याचार हा सध्याचा खूप म्हत्त्वाचा मुद्दा आहे. मणिपूरमधील घटनेने राज्यात सध्या वातावरण चांगलच तापलं आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला आला आहे. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही निषेद व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवलं.दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला. सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी मणिपूरमधील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रियांका चोप्रानेही सोशल मीडियावरुन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Priyanka Chopra Reaction On Manipur incident
Sunny Leone Real Name : सनी लिओनीने तिचं मूळ नाव का बदललं? स्वतः च केला मोठा खुलासा

मणिपूरमधील घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.या घटनेवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही आता मणिपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांकाने पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'तो व्हिडिओ व्हायरल झाला. '७७ दिवस झाले हा गुन्हा घडून. कारवाई होण्यासाठी ७७ दिवस लागले. तर्क-वितर्क? कारणे?या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. कोणतीही स्थिती किंवा काहीही परिस्थिती असो.

आम्ही महिलांना कोणत्याही खेळात मोहरे बनू देणार नाही. या गुन्ह्या विरोधात आता एकत्र आवाज आणि राग व्यक्त करायलाच हवा'. अशा पडखर शब्दात प्रियांकाने घडलेल्या घटनेचा निषेध केला'.

Priyanka Chopra
Priyanka Chopra Instagram @priyankachopra

प्रियांका आणि मणिपूरच जवळच नात आहे. 'मेरी कॉम' चित्रपटात प्रियांकाने मेरी कॉमची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी प्रियांका काही दिवस मणिपूरमध्ये राहिली होती.त्यामुळे प्रियांकाने मणिपूरमधील घटनेचा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

मणिपूरमधील घटनेने चित्रपटसृष्टीतही हादरली आहे. अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा अडवाणी, एकता कपूर, जया बच्चन, रिचा चड्डा, रेणुका शहाणे, रितेश देशमुख यांच्यासह अनेकांनी कलाकारांनी या या घटनेचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com