Ram Charan Bodyguard  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Who Is Ram Charan Bodyguard Kevin Kunta? : साऊथ सुपरस्टार राम चरणचा बॉडीगार्ड 'केविन कुंटा'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. केविन कुंटा नेमका कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पेड्डी'च्या कार्यक्रमात चाहता राम चरणला भेटण्यासाठी धावत गेला

राम चरणच्या बॉडीगार्डने त्याला रोखले

राम चरणच्या बॉडीगार्ड केविन कुंटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे

सध्या सोशल मिडिया फक्त एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे, ती म्हणजे बॉडीगार्ड केविन कुंटा (Kevin Kunta ) होय. दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाचा नुकताच प्रमोशनल लॉन्च इव्हेंट थाटामाटात पार पडला. मात्र यात मोठा गोंधळ उडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका चाहत्याने स्टेज सुरक्षेला मागे टाकून साऊथचा मेगास्टार राम चरणला भेटण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र राम चरणच्या बॉडीगार्ड केविन कुंटाने त्याला एका हाताने उचलले आणि मागे केले. मात्र या सर्वात खूप धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.

राम चरणचा फॅन धावत येताना त्याचा धक्का जान्हवी कपूरला लागतो, ती काहीशी गोंधळली आणि घाबरलेली दिसते. या व्हिडीओतील बॉडीगार्डच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राम चरण, जान्हवी कपूर आणि दिग्दर्शक बुची बाबू सना कार्यक्रमाच्या सूत्रधारांशी संवाद साधत असताना ही घटना घडली. अचानक, एक उत्साही चाहता बाहेरील बॅरिकेड्समधून सरकला आणि थेट राम चरणच्या सीटकडे धावला. जेव्हा सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सर्सनी अगदी शेवटच्या सेकंदाला त्या व्यक्तीला रोखले. त्या क्षणी शारीरिक हाणामारी झाली.

काही वेळाने परिस्थिती शांत झाल्यावर राम चरणने चाहत्यांना भेटण्यासाठी बोलावले. चाहत्याला कोणती दुखापत झाली नाही ना, याची खात्री घेतली. त्याच्याशी संवाद साधला आणि फोटो देखील काढला. राम चरणच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

केविन कुंटा कोण आहे?

राम चरणला भेटायला जाणाऱ्या चाहत्याला वाऱ्या सारखी झडप घालून पकडणारा बॉडीगार्ड केविन कुंटा आहे तरी कोण, जाणून घेऊयात. केविन कुंटा उंच, धिप्पाड आणि अत्यंत तंदुरुस्त सुरक्षारक्षक आहे. केविन कुंटाने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये (bio) स्वतःचा उल्लेख 'गांबियाचा रहिवासी' आणि 'इटलीतील फ्लोरेन्स येथे राहणारा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक MMA लढवय्या' असा केला आहे.

Tapology या संकेतस्थळावरील माहितीनुसार, केविनचे ​​खरे नाव 'अब्दू कादिर सोवे' (Abdou Kadirr Sowe) असे आहे. त्याचा जन्म १९९८ मध्ये गांबिया येथे झाला होता. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्याप्रमाणे, तो सध्या इटलीतील फ्लोरेन्स शहरातून आपल्या लढाऊ स्पर्धांमध्ये सहभागी होतो. मीडिया रिपोर्टनुसार, केविन कुंटा एका दिवसासाठी सुमारे २ ते ४ लाख रुपये मानधन मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

SCROLL FOR NEXT