मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor : कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर अर्जून कपूरची पोस्ट; रक्षाबंधनानिमित्त पुरुषांना दिला मोलाचा सल्ला

Arjun Kapoor Reaction on Kolkata Rape Case: बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरने कोलकातामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी त्याची संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. रक्षाबंधना निमित्त अर्जूनकडून इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधनाचा सण बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर आपल्या बहीण-भावासाठी खास पोस्ट करत ते या सणानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवुडचा सुपरस्टार अर्जुन कपूरने रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना आणि देशातील नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे. या पोस्टद्वारे अर्जुन कपूरने कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत देशातील महिलांच्या सुरक्षेवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्जुन कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, 'मी माझ्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा करणार आहे. पण कोलकातामध्ये घडलेल्या घटनेमुळे काय बोलावं हे समजत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणी मला राखी बांधतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन दिलं जातं. मात्र समाजातील अशिक्षित लोकांमुळे किंवा काही नराधमांमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.'

अर्जूनने पुढे असे सांगितले की, 'देशातील पुरुषांनी महिलेचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. त्यासोबतच भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी काही विशेष पाऊलं उचलणं गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांना एखाद्या महिलेसाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण कसे निर्माण करायचे हे शिकवणं गरजेचे आहे. मुलगी घराची शान असते त्यांची काळजी आणि त्यांची सुरक्षा आपली सर्वात पहिली जबाबदारी असते. त्याचबरोबर प्रत्येक मुलीनं तिच्या हक्कासाठी आणि तिच्या सुरक्षततेची काळजी स्वत: घेतली पाहिजे.'

व्हिडीओच्या शेवटी त्याने असे देखील म्हटले आहे की, 'या देशातील प्रत्येक महिला सुरक्षित आणि खुश राहिली पाहिजे. देशातील महिलांच्या सुरक्षेची कळजी पुरुषांनी सुद्धा घेतली पाहिजे. आज रक्षाबंधनानिमित्त अर्जुन त्याच्या बहिनींसोबत रक्षाबंधन सण साजरा करणार असल्याचे त्याने सांगितले. सध्या सोशल मीडियावर अर्जुन कपूरच्या रक्षाबंधन स्पेशल पोस्टची चर्चा होत आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी देखील त्याच्या पोस्टला लाइक करत त्याने योग्य मत मांडले असल्याचे म्हटले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT