Rakhi Sawant Revealed Mukesh Ambani Help Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant News: राखीच्या मदतीला धावून आले मुकेश अंबानी, व्हिडिओ शेअर करत मानले आभार...

आईच्या उपचाराचा खर्च खूपच जास्त असल्याचे सांगत राखीने मदतीसाठी आवाहन केलं होतं.

Chetan Bodke

Rakhi Sawant : बिग बॉस मराठीतील टॉप ५ मधील असलेली स्पर्धक राखी सावंत सध्या बरीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून ९ लाख रुपये जिंकून पाचव्या स्थानावर समाधान मानत एक्झिट घेतली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिने आपल्या आईच्या आजाराबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. तिने सोशल मीडियावरून आपल्या आईच्या उपचारासाठी मदत करावी अशी विनंती केली होती.

राखीची आई सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत असून रुग्णालयात तिच्या आईवर उपचार सुरू आहेत. परंतु, आईच्या उपचाराचा खर्च खूपच जास्त असल्याचे सांगत राखीने मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर आता तिच्या मदतीला उद्योगपती मुकेश अंबानी धावून आले आहेत. विरल भय्यानी या सोशल मीडियावरील पेजने राखीचा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

विरल भय्यानीने व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओत राखीने मुकेश अंबानींचे आभार मानले आहेत. सोबतच ती या व्हिडिओत म्हणते, “माझी आई आजारपणामुळे कोणाला ओळखतही नाही. तिला आम्ही दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करत आहोत. या रुग्णालयाची फी अंबानींमुळे थोडी कमी करण्यात आली आहे. मला मदत केली त्याबाबत मी अंबानींचे आभार मानते.”

नुकतेच राखीने पती आदिलसोबत प्रेमविवाह करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. राखीने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. जरी तिने आता नव्या आयुष्याला सुरुवात केली असली तरी त्या दोघांनी सात महिन्यापूर्वीच लग्न केले असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

SCROLL FOR NEXT