Rakhi Sawant And Aadil Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

'लग्ना आधीच...'; राखी सावंतला आदिलच्या बाळाची आई व्हायचंय!

राखीने एक्दम हटके स्टाईलने आलियाच्या प्रेग्नेंसीवर रिअ‍ॅक्शन दिली.

Shivani Tichkule

मुंबई - आलिया भट्टने (Alia Bhatt) 27 जून रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या. आता राखी सावंतनं (Rakhi Sawant) देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. पण राखीने एक्दम हटके स्टाईलने आलियाच्या प्रेग्नेंसीवर रिअॅक्शन दिली.

ड्रामा क्वीन राखी सावंतलाही आई व्हायचं आहे. ही अफवा नाही, खुद्द राखीने पापाराझींसमोर याचा खुलासा केला आहे. राखी सावंतचे आजकाल आदिलवर प्रचंड प्रेम आहे, अभिनेत्री कुठेही जाते त्यावेळी आदिल देखील तिच्यासोबत दिसतो. जेव्हा राखीला आलिया भट्टच्या गरोदरपणाच्या बातम्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेत्रीने तिची इच्छा अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिले.

काय म्हणाली राखी?

राखीच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पापाराझी राखीला आलिया आणि रणबीरच्या गूड न्यूजबाबत सांगताना दिसत आहेत. यावर राखीनं मी कधी आई होणार, मला आई व्हायचे आहे. लग्नाआधी देखील चालेल. सध्या असंच होतंय लग्नाआधीच लोक प्रेग्नंट होत आहेत. पण मी जेव्हा प्रेग्नंट होणार त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी लग्न करणार असेही राखीने स्पष्ट केले.

राखी गेल्या काही महिन्यांपासून आदिल दुर्रानीला डेट करत आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

SCROLL FOR NEXT