Rakhi sawant On saif ali khan saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi sawant On Saif Ali Khan: 'सुरक्षा व्यवस्था असूनही...'; सैफ अली खानच्या हल्ल्यावर राखी सावंतचा संताप

Rakhi sawant On Saif Ali Khan: सैफ अली खानवरील हल्ल्यावर सर्व स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या. आता राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी तिने सैफच्या इमारतीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Saif Ali Khan: बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर गुरुवारी चाकूने हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने यावर प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात तिने सैफ अली खानच्या इमारत व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. राखीने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत प्रश्न उपस्थित केले आहेत की, हाय प्रोफाइल इमारतींमध्ये सुरक्षेचा अभाव कसा दिसून येत आहे.

हल्ल्यामुळे सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. या हल्ल्याबद्दल राखी म्हणाली, “अरे देवा, ही खूप वाईट बातमी आहे. माझ्या स्ट्रगलिंगच्या सुरुवातीच्या काळात, मी राकेश रोशनच्या चित्रपटात सैफ अली खानसोबत एका गाण्यात काम केले होते. सैफचा इतका मोठा अपघात होऊ शकतो, ही मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती.

या इमारतीतील लोक काय करतात ?

यासोबतच राखी सावंतने इमारतीच्या मालकावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाली की हे इमारतीचे लोक काय करतात? तुम्ही दरमहा इतके पैसे आकारता आणि सीसीटीव्ही कॅमेराही बसवू शकत नाही? सुरक्षा व्यवस्था असूनही सैफवर हल्ला कसा झाला? २०२५ ची अशी वाईट सुरुवात का झाली. गुरुवारी म्हणजेच १६ जानेवारी रोजी सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला. १६ जानेवारी रोजी पहाटे २:३० वाजता एका घुसखोर सैफच्या वांद्रे येथील ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसला आणि त्याने हा हल्ला केला.

२.५ इंच लांब चाकू काढला

मिळालेल्या माहितीनुसार, घुसखोर अभिनेत्याच्या घरात घुसला तेव्हा त्याने त्याच्या मोलकरणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, जेव्हा सैफने सर्व काही शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर घुसखोराने सैफवर चाकूने हल्ला केला. सैफला ऑटोने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या मणक्यातून २.५ इंच लांब चाकू काढण्यात आला. सध्या, अभिनेता धोक्याबाहेर आहे, परंतु तो अजूनही डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT