rakhi sawant new viral video Instagram/@viralbhayani
मनोरंजन बातम्या

राखी सावंतला आठवली तिची चूक; ...अन् मग बॉयफ्रेंडसमोर चेहरा लपवून पळाली

राखी सावंत अनेकदा तिच्या वागण्या-बोलण्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच तिचा अगोदरचा पती रितेश सिंगबद्दल बोलताना तिने सांगितले की तो तिला त्रास देत आहे.

Sanika

Rakhi Sawant Viral Video: राखी सावंत अनेकदा तिच्या वागण्या-बोलण्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच तिचा अगोदरचा पती रितेश सिंगबद्दल बोलताना तिने सांगितले की तो तिला त्रास देत आहे. त्यामुळे राखीने रितेशविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. राखीने रडत रडत जाऊन त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र, यावेळी राखी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अर्थात हा ही व्हिडिओच आहे! राखीचा एक व्हिडिओ (Rakhi Sawant Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी तिच्या प्रियकरासोबत (Rakhi Sawant Boyfriend) विमानतळावर दिसत आहे. पण तिथे असे काही घडते की राखीला तिचा चेहरा लपवावा लागतो.

पहा व्हिडिओ-

...अन् राखी पासपोर्ट आणायला विसरली;

हा व्हायरल व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. ती म्हणते, 'माफ करा, मी माझा पासपोर्ट घरीच विसरले.' राखी आपला चेहरा लपवते आणि तिथून दुसरीकडे पळत जाते. जेव्हा आदिल राखीकडे जातो तेव्हा तिला तिचा फोन आणि बॅग देते आणि तिचा पासपोर्ट शोधू लागते. आता बरेच लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत की राखी खरोखर तिचा पासपोर्ट घरी विसरली आहे की ती नाटक करत आहे. पण राखीच्या या व्हिडिओला मात्र आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.

लवकरच पुन्हा लग्न करणार राखी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंत लवकरच तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न करू शकते. काही दिवसांपूर्वी राखीने याबाबत बोलताना म्हटलं होतं- 'यावेळी मी मेंदीही काढेन आणि माझी लग्नाची मिरवणूकही येणार आहे.' मात्र, त्यांचे लग्न कधी होणार हे माहित नसल्याचेही राखीने सांगितले. बरं पण, राखीचं लग्न झाल्यावर सर्वांना कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT