Rakhi Sawant Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: शेवटच्या क्षणी राखीच्या आईला असह्य वेदना, व्हिडिओ पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले...

नुकतेच सोशल मीडियावर आईच्या निधनानंतर राखीने एक व्हिडिओ शेअर केली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant: आपल्या विचित्र स्टाईलने चाहत्यांचे मनोरंजन करणारी राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राखीची आई जया यांचे काल रात्री मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे जया भेडा यांनी जुहूच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राखी आणि तिचे भावंड पोरके झाले. ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईच्या काही व्हिडिओ शेअर करत होती. आईच्या निधनानंतरही तिने एक व्हिडिओ शेअर केली आहे.

याआधी हॉस्पिटलमधून राखीने अनेक व्हिडिओ शेअर केल्या होत्या, आता आई गेल्यानंतर राखीने तिचा शेवटचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओत राखी खूपच रडताना दिसून येत आहे. राखी सावंतचे तिच्या आईवर खूप प्रेम होते. तिने अनेकदा त्याचा उल्लेखही केला होता. ती जितक्या वेळा बिग बॉसच्या घरात गेली आहे, तितक्या वेळ तिला आईची आठवण आली आहे.

तिने स्पर्धकांसोबत अनेकदा आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा मराठी बिग बॉसच्या घरातून राखी बाहेर पडली. त्यानंतर आईला ब्रेन ट्युमरचे निदान झाल्याचे कळले. त्याबद्दल तिने एक व्हिडीओही बनवत पोस्ट केला होता. नुकतेच राखीने एक हॉस्पिटलमधील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आईसाठी व्याकूळ होत रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ राखीने काल रात्री आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

राखी सावंतने व्हिडिओ शेअर म्हणते, "आज माझ्या आईचे छत्र माझ्या डोक्यावरुन निघून गेले. माझ्याकडे आता आयुष्यात गमावण्यासारखे काहीही राहिले नाही. माझं तुझ्यावर खुप प्रेम असून तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीही नाही. आता माझी हाक कोण ऐकणार आणि कोण मला मिठी मारणार आई. आता मी काय करू? मी कुठे जाऊ... मला तुझी आठवण येते." असं म्हणत आहे.

राखी सावंतच्या आईच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्समध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासोबत रिद्धिमा पंडित, रश्मी देसाई, पवित्रा पुनिया, निशा रावल, राहुल वैद्य, अली गोनी, मन्या दत्ता यांच्यासह अनेक जया यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

SCROLL FOR NEXT