Rakhi Sawant Instagram
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Mimic Malaika Arora Walk: मलायका बघा अशी चालते, राखीने कॅमेऱ्यासमोरच केली तिची नक्कल, VIDEO पाहा

सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rakhi Sawant Mimic Malaika Arora Walk: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधानांमुळे तर कधी खासगी आयुष्यातील कारणांमुळे चर्चेत असते. नुकतीच राखी फिटनेस क्वीन मलायका अरोराची खिल्ली उडवताना दिसली. राखीने मलायकाच्या चालण्याच्या स्टाईलची मिमिक्री करत मजेदार कमेंट केली आहे, सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, राखी मलायका अरोरा सारखी चालताना दिसत आहे. तिने मलायका अरोराच्या चालण्याच्या स्टाईलवर मिमिक्री करत साऱ्यानांच हसवले आहे. याशिवाय राखीने, 'मला मलायकाच्या चालण्याची स्टाईल आवडते आणि आजपासून मी देखील असच चालणार' असे तिने म्हटलं आहे. सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील मलायका तिच्या चालण्याच्या स्टाईलमुळे ट्रोल झाली आहे. तिच्या चालण्याच्या स्टाइलमुळे ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.

राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वीच राखीने पती आदिलसोबत लग्न करून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. राखीने मे २०२२ मध्ये आदिलसोबत लग्न केले. राखीने मारहाण आणि पैसे चोरल्याच्या आरोप करत पती आदिल खानला तुरूगांत डाबले. सध्या आदिल तुरूगांत आहे. दुबईत राखीने तिचा डान्स क्लास सुरू केला असून काही म्युझिक व्हिडीओमध्ये राखी दिसते आहे.

Edited By: Manasvi Choudhary

Maharashtra Live News Update: OBC Protest: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल

Truck Accident: ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, पार्किंग करताना हँडब्रेक लावायला विसरला; 3 वाहनांना धडक देत खड्ड्यात पडला, VIDEO

Government Scheme: सरकारची नवी योजना! महिलांना मिळणार ₹१०,०००; या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Shocking : दोन दिवसांपूर्वी वडिलांची आत्महत्या, ज्या झाडाजवळ आयुष्य संपवलं तिथेच चिमुकलीचा मृतदेह आढळला; बीड हादरले

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT