Adil Khan Durrani Breaks Silence Saam TV
मनोरंजन बातम्या

Adil Khan Breaks Silence: राखी सावंतचं टेन्शन वाढलं; तुरुंगातून बाहेर आलेला आदिल खान मोठा खुलासा करणार

Rakhi Sawant In Trouble: राखी सावंतने आदिल खानवर गंभीर आरोप करत त्याला तुरुंगात पाठवले.

Pooja Dange

Rakhi Sawant Husband Alid Khan Release From Jail:

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या वर्षाच्या सुरुवातीला आदिल खानसोबत लग्न झाल्याचे सांगून अभिनेत्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर आदिल खानवर गंभीर आरोप करून त्याला तुरुंगात पाठवले.

आदिल खानची तुरुंगातून सुटका

आदिल खान गेले काही महिने म्हैसूर तुरुंगात होता. त्याच्यावर धमकी, फसवणूक यांसारखे अनेक आरोप करण्यात आले आहेत. आदिलने केलेल्या विश्वासघातावषयी राखी अनेकदा पापाराझींशी बोलताना दिसली. तुरुंगातून सुटल्यानंतर आदिल खान मुंबईत दिसला आहे.

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आदिल खान पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट झाला. पापाराझींशी बोलताना आदिल म्हणाला की तो लवकरच पत्रकार परिषद घेऊन सत्य उघड करणार आहे तो म्हणाला की, "माझ्यासोबत खूप चुकीचे घडले आहे. मी काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगेन. आता कोणीतरी येऊन मला तुरुंगात पाठवून प्रसिद्धी मिळवू शकत नाही."

आदिल खान पुढे म्हणाले की, "हे काय, का आणि कोणत्या कारणामुळे घडले ते मी तुम्हाला सांगेन. मी माझी बाजू तुमच्यापुढे मांडेन. मला कसे फ्रेम केले गेले ते मी सांगेन. राखीसोबत आणखी काही लोकांचाही यात सहभाग होता. माझे काय झाले ते जाणून घ्या. मला कोटी घ्यायचे आहेत की यायचे आहेत ते बघा.

राखी सावंतचा पती आदिल खान तुरुंगात का गेला?

या वर्षी फेब्रुवारीमध्ये राखी सावंतने पती आदिल खानवर गंभीर आरोप करत पोलिसात केस दाखल केली होती. राखीने दावा केला की, तिची पैशांची फसवणूक करण्यासोबतच आदिलने तिचे अॅडल्ट व्हिडिओही बनवले. म्हैसूरमधील एका महिलेने आदिलवर छेडछाडीचा आरोपही केला होता. त्यामुळे आदिल खानला अनेक महिने तुरुंगात राहावे लागले.

राखी सावंतने मे 2022 मध्ये आदिल खानशी लग्न केले. राखीने 7 महिन्यांनंतर जानेवारी 2023 मध्ये बिग बॉस मराठी ४ च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या लग्नाची घोषणा केली. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव फातिमा ठेवल्याचा खुलासाही राखीने केला होता. गेल्या महिन्यात राखीने सांगितले की, आता ती आदिलला घटस्फोट देणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT