Rakhi Sawant Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: 'ड्रामा क्वीन' राखी सावंत मनातलं दुःख सांगताना भोवळ येऊन कोसळली, पोलीस ठाण्याबाहेरच पडली बेशुद्ध

काल रात्री पोलिस स्टेशनमधून बाहेर पडत असताना राखी पत्रकारांसोबत संवाद साधताना अचानक बेशुद्ध पडली.

Chetan Bodke

Rakhi Sawant Faints On Police Station: बिग बॉस फेम राखी सावंतचा पती आदिल खान दुर्राणीवर गंभीर आरोप करत राखीने आपली फसवणूक आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. काल दुपारी आदिलला ओशिवरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राखीने सोमवारी मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्थानकाच्या बाहेर हजेरी लावली होती. या सर्व प्रकारानंतर आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. काल रात्री पोलिस स्टेशनमधून बाहेर पडत असताना राखी पत्रकारांसोबत संवाद साधताना अचानक बेशुद्ध पडली.

काल दुपारी आदिलला अटक झाल्यानंतर राखीने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. राखी माध्यमांसमोर म्हणते, 'आदिलच्या आईशी बोलणं झालं. आई तर आई असते, मी त्यांना सांगितलं की मी नेहमीच तुमची सून असेल मी तुमच्यासोबत कायम उभी असेल मात्र आदिलबाबत काही बोलू नका. त्या सुद्धा म्हणाल्या मी तुझ्या जागी असते तर मी त्याला सोडलं असतं तूही त्याला सोड.'

पुढे राखी म्हणते, 'मुंबई हे खुप मोठे शहर आहे, स्टार बनण्याच्या नादात, मुलींच्या नादात त्याने हे सगळं केलं. त्याचे अनेक क्रिमिनल रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतील. बंगलोर, म्हैसूरपासून त्याचे अनेक काळे धंदे आहेत. त्याला स्टार बनायचे होते आणि त्याचे अनेक अफेअर्स आहेत. त्याच्यामुळे अनेक मुलींना त्रास सहन करावा लागला आहे. लग्नाआधी याचा खरा चेहरा माहित असता तर हा दिवस मला बघावाच लागला नसता.'

राखीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये राखी माध्यमांसमोर बोलताना दिसत आहे आणि नंतर तिला अचानक चक्कर येते. आसपासचे लोक तिला लगेचच सावरतात देखील. तिला लगेचच उचलून गाडीजवळ नेण्यात आले. राखीचे डोळे, चेहरा रडून रडून सुजलेला स्पष्टपणे दिसत आहे.

पोलिस स्थानकाबाहेर सुरु असलेल्या राखीच्या ड्राम्यावर नेटकरी बरेच संतापलेले दिसत आहेत. हिला काहीच कसे वाटत नाही प्रसिद्धीसाठी काहीही करणार का असा सवाल काही युझर्सने तिला पुन्हा एकदा विचारलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT