Rakhi Sawant Ex Husband Support Her Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: आदिलच्या वादात राखीच्या पुर्वाश्रमीच्या पतीची उडी, म्हणतो, "तीन महिन्यांआधीच राखीने मला..."

राखी आदिलच्या वादात राखीचा माजी पती रितेश राजने उडी घेतली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Ex Husband Support Her: राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या लग्नाबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे ती चर्चेत आली होती. त्याचवेळी राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यातील वाद अधिकच भडकत आहे. राखीने आदिलवर गंभीर आरोप करत ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आदिलला पोलिसांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या वादात राखीचा माजी पती रितेश राजने उडी घेतली आहे.

राखीच्या वैवाहिक जीवनातील चर्चेदरम्यान राखीचा पुर्वाश्रमीचा पती रितेश तिच्या समर्थनार्थ समोर आला आहे. रितेशने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून राखी आणि आदिलवर कमेंट केली आहे. यादरम्यान रितेशने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. या लाईव्हदरम्यान तो म्हणतो की, काहीही झाले तरी मी राखीच्या पाठीशी उभा राहीन.

लाईव्ह दरम्यान रितेश म्हणतो, “राखीने आदिलचा सर्व किस्सा मला तीन महिने आधीच सांगितला आहे. राखीचे डोळे खरे सांगतात. पण आता न्यायालय योग्य निर्णय घेईल. राखीने मला तीन महिन्यांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. राखी खोटं बोलत नाही. आता तुम्हाला समजले असेलच कोणाचे तरी हृदय तोडण्याचे दुख. मी नेहमी तिच्यासोबत असतो. ती ज्या परिस्थितीतून जात आहे त्याचाही मी सामना केला आहे.”

राखीच्या जीवाला धोका असल्याचे रितेशने सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये रितेश राखीला सतत स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहे. राखी सावंतच्या लग्नाचा वाद आता तिची खासगी बाब झाली नसून सार्वजनिक बाब झाली आहे या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे सर्वांच्या समोर येत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांना सतत आश्चर्याचा धक्का बसत आहे.

राखी सावंतचे रितेशसोबत गेल्या काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. दोघांनी 'बिग बॉस 15' च्या घरात एकत्र प्रवेश केला पण ग्रँड फिनालेनंतर ते वेगळे झाले. त्यानंतर राखीने रितेशपासून वेगळे होण्यामागचे कारणही स्पष्ट केले होते. तो म्हणाला की, बिग बॉसनंतर बरेच काही घडले. मात्र, राखीला आजही माझा पाठिंबा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thread Benefits: लाल, काळा की पिवळा? हातातील धाग्याचा रंग ठरवतो तुमचं भाग्य

उड्डाणपूल प्रकल्पावरून कल्याणमध्ये संघर्ष; बुद्धभूमी फाउंडेशनची न्यायाची मागणी

Shocking : मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Bollywood Actress: बॉलिवूडच्या पहिल्या १०० कोटींचा चित्रपट देणारी ही अभिनेत्री माहिती आहे का?

BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT