Entertainment News in Marathi
Entertainment News in Marathi Instagram/@rakhivijan
मनोरंजन बातम्या

TMKOC : दयाबेनची एन्ट्री पुन्हा लांबणीवर; 'ती' बातमी केवळ अफवा! राखीने स्वतः केला खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षक गेल्या ४ वर्षांपासून त्यांच्या आवडत्या दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. या चार वर्षांत अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली, ज्यांची दयाबेन बनण्याची चर्चा होती, मात्र आजपर्यंत दिशा वाकानीची जागा एकही अभिनेत्री घेऊ शकली नाही. काही दिवसांपुर्वीच बातम्या आल्या होत्या की, 'हम पांच'ची प्रसिद्ध अभिनेत्री राखी विजन (टंडन) 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारणार आहे. मात्र आता ही बातमी देखील अफवा ठरली आहे. खुद्द राखी विजनले ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्येही ती सहभागी होणार नसल्याच स्पष्ट झालं आहे. याबाबत राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. (Rakhi Vijan says she is not playing Dayaben on Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

हे देखील पाहा -

अभिनेत्री राखी विजनने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या कोलाजमध्ये एका बाजूला दिशा वाकानी आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोटो आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'ही बातमी अफवा आहे...ज्याने मला आश्चर्य वाटले. मला निर्माता किंवा वाहिनीनेही संपर्क केलेला नाही.(Entertainment News in Marathi)

दिशा वाकाणीच्या पुनरागमनावर निर्माते काय म्हणाले?

दयाबेन शोमध्ये परत येण्याबाबत 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी म्हणाले, 'याआधीही आम्ही दयाबेनला शोमध्ये (TMKOC) परत आणण्याचा विचार केला होता, परंतु कोविड -19 मुळे गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. पण आता आम्ही लवकरच दयाबेनला शोमध्ये परत आणण्याचा विचार करत आहोत. आम्ही त्यांना एक-दोन महिन्यांत परत आणण्याचा प्रयत्न करू. दिशा वाकाणीने शोमध्ये परतावे अशी आमची इच्छा आहे, पण तिच्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्याही आहेत त्यामुळे ती शोपासून लांब आहे. तरीही मला आशा आहे की ती परत येईल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT