Comedian star Raju Srivastava
Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

राजू श्रीवास्तव अद्यापही बेशुद्ध; डॉक्टरांनी सांगितले 'हे' कारण

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) ऑगस्टमध्ये जीममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करताना अचानक खाली कोसळला यानंतर त्याला दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी हदय विकाराचा झटका आल्याचे स्पष्ट केले असता राजूची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. यानंतर मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयातून राजूच्या प्रकृतीबाबत अनेक अपडेट समोर आल्या आहेत.

राजू श्रीवास्तव सध्या बेशुद्ध अवास्थेत आहे. अद्यापही शुद्धीत आलेला नसला तरी अनेकदा प्रकृती सुधारण्याबाबत नवनवीन अपडेट समोर आल्या आहेत. अलिकडेच राजूला व्हेटिंलेटरवरून हलवले असता. अचानक ताप आला त्यानंतर पुन्हा व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. सध्या रूग्णालयातील संपूर्ण टिम राजूवर बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकप्रिय कॉमेडियनची प्रकृती स्थिर असून तो व्हेटिंलेटरवर आहे. परंतु राजूच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच राजू बरा होईल अशी आशा आहे.

डॉक्टरांच्या अहवालानुसार, राजूच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आहे, मेंदूपर्यत ऑक्सिजन सक्रंमित होत नसल्यामुळे राजू शुद्धीत येत नसल्याचे समोर आले आहे. अलिकडेच राजूला दिल्लीतील एम्स रूग्णालयातून मुबंईतील रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र राजूच्या कुटुंबियांनी हे वृत्त फेटाळून लावले. राजू पूर्णत: बरा होत नाही तोपर्यत हलवणार येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजू श्रीवास्तवचा भाऊ दिपू श्रीवास्तवने सांगितले रूग्णालयातून त्याला कुठेही न हलवता थेट त्याच्या घरी घेऊन जायचे आहे. आम्हाला विश्वास आहे, की राजूची प्रकृती लवकरच बरी होईल आणि तो शुद्धीत येईल. सुप्रसिद्ध कॉमेडीस्टार राजूला बरे होण्यासाठी त्याचे संपूर्ण चाहते प्रार्थना करत आहेत. कुटुंबासोबतच राजूच्या चाहत्यांनाही राजू लवकरच बरा होईल आणि हसवण्यासाठी 'कमबॅक' करेल.अशी आशा व्यक्त केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT