Raju Srivastava Health Update/rajusrivastavaofficial/instagram SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत मॅनेजरनं दिली महत्वाची अपडेट

राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत असून, व्हेंटिलेटरवर आहे.

साम ब्युरो

Raju Srivastava Health Update Today | नवी दिल्ली: विनोदवीर आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हा गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून त्याची प्रकृती गंभीर असून, सध्या तो दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आहे. सध्या तो बेशुद्धावस्थेत असून, डॉक्टरांचं पथक त्याच्यावर उपचार करत आहे. त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी राजू श्रीवास्तवचा मॅनेजर नयन सोनी याने राजूच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत (Health) आता किंचित सुधारणा होत आहे. शरीराची हालचाल वाढत आहे. मात्र, तो शुद्धीवर येण्यासाठी अद्याप आठवडाभराचा कालावधी लागेल, असे त्याच्या मॅनेजरने सांगितले.

मॅनेजर नयन सोनी याने सांगितले की, 'राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नयन सोनीने सांगितले की, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. उपचारांना तो प्रतिसाद देत आहे. राजूच्या शरीराच्या हालचाली काही प्रमाणात वाढलेल्या आहेत. सध्या तो आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे.'

स्टॅण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव हा १० ऑगस्ट रोजी व्यायाम करताना अचानक खाली कोसळला. त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताला डॉक्टरांनी दुजोरा दिला होता. त्याची एन्जिओप्लास्टीही झाली होती. अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता तो उपचारांना प्रतिसाद देत आहे.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्याच्या मॅनेजरने सांगितले आहे. त्यामुळे राजूचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद आहे. राजू लवकरात लवकर बरा होऊन घरी परत यावा, यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

अभिनेता शेखर सुमननेही अलीकडेच राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. शेखर सुमन हा त्याचा जवळचा मित्र आहे. राजू श्रीवास्तवची प्रकृती आता स्थिर आहे, असे ट्विट त्याने केले होते. तुमच्या प्रार्थनेमुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, प्रार्थना सुरूच ठेवा, असं आवाहन शेखर सुमननं केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT