Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

Raju Shrivastav Health Update: आयसीयूमध्ये केवळ पत्नीला प्रवेश, डॉक्टरांनी काय सांगितलं?

कॉमेडीयन-अभिनेता राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार घेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कॉमेडीयन-अभिनेता राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीच्या एम्स रूग्णालयात (AIIMS Hospital) उपचार घेत आहे. मागील काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) व्हेंटिलेटरवर असून सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव याच्या प्रकृतीवर डॉक्टरांची संपूर्ण टीम लक्ष ठेवून आहे. दरम्यान आता राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्याची प्रकृती अशीच सुधारत राहिल्यास लवकरच तो शुद्धीवर येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पाहा व्हिडीओ-

माहितीनुसार, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजूच्या हातापायाची हालचाल सुरू झाली आहे. त्याचवेळी, तो काही क्षणांसाठी डोळेही उघडतो आहे. दरम्यान, डॉक्टरांनीही (Doctor) काही वेळासाठी व्हेंटिलेटर काढले होते, अशी माहिती मिळत आहे.

विनोदवीर राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत सर्वांनाच चिंता होती. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी कुटुंबीय, चाहते आणि निकटवर्तीय प्रार्थना करत आहेत. फिल्मी जगतातील लोक राजूच्या कुटुंबीयांशी सतत फोनवर संपर्क साधून त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. राजू श्रीवास्तवचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, केवळ कानपूरमध्येच नाही, तर जगातील कानाकोपऱ्यातून राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना सुरू आहेत.

विनोदवीर राजू श्रीवास्तची प्रकृती लवकरच ठीक होऊन चंदेरी दुनियेत आपल्या चाहत्यांना हसवायला परतेल. यासाठी गाण देखील आलं आहे. 'राजू फिर से आएंगे वो सबको हंसाएंगे' असे गाण्याचे बोल आहेत. अन्नू अवस्थी कानपूर यूट्यूब चॅनलवरून हे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यावर राजूच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

राजू श्रीवास्तवची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या हातपायांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राजूबाबत कोणतीही अफवा पसरवू नका, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे अलीकडेच, राजूच्या मेंदूला संसर्ग झाल्यानंतर डॉक्टर अधिक अॅलर्ट झाले आहेत. डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांना आयसीयूमध्ये प्रवेशास बंदी केली होती.

मात्र, प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आता राजूच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांनाच केवळ आयसीयूमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टरांनी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT