Rajkummar-Patralekha SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rajkummar Rao-Patralekha: राजकुमार राव- पत्रलेखा झाले आई-बाबा, लग्नाच्या वाढदिवशी मिळालं मोठे गिफ्ट

Rajkummar Rao-Patralekha Blessed With Baby Girl : बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपं राजकुमार राव आणि पत्रलेखा आई-बाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड कपल राजकुमार राव-पत्रलेखा यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

राजकुमार राव-पत्रलेखा लग्नाच्या वाढदिवशी आई- बाबा झाले.

पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेता राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा (Patralekha) आई-बाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या क्यूट कपलने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दाखवली आहे.

राजकुमार रावने पोस्ट करून आपण बाबा झाल्याची खुशखबर दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नाच्या चार वर्षांनी राजकुमार आणि पत्रलेखाने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. तसेच राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. पोस्टला कपलने खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवसाला देवाने आम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद दिला..." सध्या राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्यावर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट करून बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली होती आणि आता नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा आला आहे. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2021 ला लग्नगाठ बांधली होती. आता 15 नोव्हेंबर 2025 ला त्यांना जोडप्याला कन्यारत्न झालं आहे.

2014 मध्य रिलीज झालेल्या 'सिटीलाइट्स' चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. चाहते आता राजकुमारच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अलिकडेच बॉलिवूडचे पावर कपल विकी कौशल-कतरिना कैफ हे देखील आई-बाबा झाले आहेत. कतरिनाने क्यूट मुलाल जन्म दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ

Makeup Side Effect: रोज हेवी मेकअप केल्याने होऊ शकतो 'हा' त्रास; करा आजच तुमच्या रुटीनमध्ये बदल

Chana Bhel Recipe: चटापटीत चणा भेळ कशी बनवायची?

Genelia Deshmukh: मिसेस देशमुखांचा रुबाबदार लूक; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Kitchen Hacks: कडीपत्ता एक महिना ताजा-टवटवीत कसा ठेवावा? जाणून घ्या सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT