सध्या बॉक्स ऑफिसवर 'मालिक' आणि 'आँखों की गुस्ताखियाँ' (Aankhon Ki Gustaakhiyan) हे चित्रपट एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत हे चित्रपट 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन चित्रपटात बॉलिवूडचे स्टार अभिनेते राजकुमार राव आणि विक्रांत मेस्सी पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन आणि ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.
राजकुमार राव आणि मानुषी छिल्लरचा 'मालिक' चित्रपट मीडिया रिपोर्टनुसार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
'मालिक' चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर एकूण 14.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'मालिक' (Maalik) हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.'मालिक' चित्रपटात राजकुमार रावसोबत मानुषी छिल्लर, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अंशुमन पुष्कर आणि स्वानंद किरकिरे हे कलाकार पाहायला मिळत आहेत. 'मालिक' चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मालिक' चित्रपटाचे बजेट 54 कोटी रुपये आहे.
विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपट ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रिलीजच्या 45 ते 60 दिवसांत किंवा सप्टेंबरच्या शेवटी चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
'आँखों की गुस्ताखियाँ' ही एक लव्हस्टोरी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपटाचे कलेक्शन 1.2 कोटी रुपये झाले आहे. 'मालिक'ने 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपटाला कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. विक्रांत मेस्सीच्या 'आँखों की गुस्ताखियाँ' प्रेक्षकांकडून जास्त प्रतिसाद येत नसल्यामुळे कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.