Shaadi Main Zaroor Aana Re Release  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaadi Main Zaroor Aana: राजकुमार रावचा 'शादी में जरूर आना' चित्रपट होणार रि-रिलीज; जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार प्रदर्शित

Shaadi Main Zaroor Aana Movie Re Release : अलीकडेच २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. आता अनेक वर्षांनी पुन्हा एक आणखी एक चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Shruti Kadam

Shaadi Main Zaroor Aana Re Release : बॉलिवूडमधील अनेक चित्रपट सध्या एकामागून एक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहेत. आतापर्यंत ये जवानी है दिवानी, जब वी मेट, रणबीर कपूरचा रॉकस्टार, तुंबाड, रेहना है तेरे दिल में, जिंदगी ना मिलेगी दोबारा, सनम तेरी कसम असे अनेक जुने चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील अनेक चित्रपटांनी पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. आता अनेक वर्षांनी आणखी एक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट म्हणजे राजकुमार रावचा 'शादी में जरूर आना'. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे जाणून घेऊयात.

राजकुमार रावचा चित्रपट या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

राजकुमार रावच्या 'शादी में जरूर आना' या चित्रपटात अभिनेत्री कृती खरबंदा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनाची माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिले, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव आणि कृती खरबंदाचा 'शादी में जरूर आना' ७ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये परत येत आहे.' हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हा चित्रपट आधी थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव चुकवला असेल, तर ही वेळ तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

'सनम तेरी कसम' ने केली भरघोस कमाई

अलीकडेच २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांचा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला जम बसवला नव्हता, पण जेव्हा तो पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने कमाईच्या बाबतीत जुने सर्व रेकॉर्ड मोडले आणि एक नवीन रेकॉर्डही प्रस्थापित केला. आता राजकुमार रावचा 'शादी में जरूर आना' हा चित्रपटही अशीच जादू करू शकेल की नाही हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT