Shah Rukh Khan Dunki Film Profit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Dunki Film: शाहरुखच्या 'जवान'नंतर 'डंकी'ची चर्चा; रिलीजआधीच १०० कोटींची कमाई

Dunki Film: शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ने प्रदर्शनाच्या आधीच बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केलेली पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Dunki Film Profit

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपट येत्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अद्याप तरी चित्रपटाचा टीझर आणि एक गाणंच रिलीज झालेलं आहे. तोच चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाने आपल्या बजेटच्या आसपास कमाईचा आकडा गाठला आहे.

‘पठान’ आणि ‘जवान’ ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट रिलीज होत आहे. शाहरुखच्या या चित्रपटाचा बजेट फारच कमी आहे. त्याचा हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. किंग खानचा यापूर्वी ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट सर्वात कमी बजेट असलेला चित्रपट होता. त्या चित्रपटाचे बजेट ९० कोटी इतके बजेट होते. तर राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटाचा बजेट केवळ ८५ कोटी इतकाच आहे. (Bollywood Film)

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी हे दोघेही चित्रपटाला होणारा नफा दोघांमध्ये वाटून घेणार आहे. समोर आलेल्या बजेटमध्ये तो आकडा फक्त चित्रपटाचा बजेटच आहे, त्यामध्ये स्टार कास्टच्या फीचा समावेश नाही. एकंदरीतच सर्व खर्च पकडून चित्रपटाचे एकूण बजेट १२० कोटी इतके आहे. चित्रपटाची सर्वत्र शुटिंग जवळपास ७५ दिवसांमध्ये पूर्ण झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डंकी’ चे नॉन थिएट्रिकल राईट्स ‘जवान’च्याच किंमतीमध्ये विकले गेले आहे. प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे. (Bollywood News)

‘डंकी’च्या आधी शाहरुखचा प्रेक्षकांच्या भेटीला ‘जवान’ चित्रपट आला होता. चित्रपटाने भारतामध्ये ६०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे, तर जगभरामध्ये या चित्रपटाने ११०० कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त ‘जवान’नेच नाही तर ‘पठान’ने सुद्धा बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT