Lal Salaam Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lal Salaam Promo Released: वाढदिवशी रजनीकांत यांचे चाहत्यांना अनोखं गिफ्ट; सुपरस्टारच्या ‘लाल सलाम’चा धमाकेदार प्रोमो आऊट

Rajinikanth New Film Promo Released: दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी वाढदिवशी आपल्या चाहत्यांना एक हटके गिफ्ट दिलं आहे. बहुचर्चित ‘लाल सलाम’ चित्रपटाचा सोशल मीडियावर प्रोमो रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Rajinikanth Lal Salaam Promo Released

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी वाढदिवशी आपल्या चाहत्यांना एक हटके गिफ्ट दिलं आहे. बहुचर्चित ‘लाल सलाम’ चित्रपटाचा सोशल मीडियावर प्रोमो रिलीज झाला आहे. ‘जेलर’नंतर रजनीकांत यांच्या दोन आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. ‘लाल सलाम’ आणि ‘थलैवर १७०’ या दोन चित्रपटांचा प्रोमो रजनीकांतच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Actor)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित, ‘लाल सलाम’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रोमोने आणि अभिनेत्याच्या लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कुर्ता आणि पायजमा असा लूक रजनीकांत यांचा पाहायला मिळत आहे. ॲक्शननेच चित्रपटाच्या प्रोमोची सुरुवात होते. रजनीकांत यांनी आपल्या खास शैलीमध्ये गुंडांची धुलाई करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या ह्या खास लूकनेच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. (Tollywood)

टीझरच्या शेवटी, गुंडांची धुलाई केल्यानंतर रजनीकांत टोपी घालून नमाज पठण करताना दिसत आहेत. नमाज पठाण करताना त्यांच्या इथे, कुराणही दिसत आहे. चित्रपट येत्या २०२४ मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर जगभरामध्ये रिलीज होणार आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटामध्ये, सुपरस्टार रजनीकांत यांनी मोईदीन भाईचे पात्र साकारले. चित्रपटाच्या कथेचे लेखन आणि दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रजनीकांत यांच्यासोबत, विष्णु विशाल, विक्रांत, विग्नेश आणि जीविता हे स्टारकास्टही दिसत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT