Rajinikanth Movie Coolie Advance Booking  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Coolie Movie: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; प्रदर्शनापूर्वीच केलं अर्धे बजूट वसूल, ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा किती?

Rajinikanth Movie Coolie Advance Booking: रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कुली' सतत चर्चेत असतो. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे आणि चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच २५० कोटींची कमाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Rajinikanth Movie Coolie Advance Booking: प्रेक्षक सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'कुली' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे रेकॉर्ड मोडेल असा विश्वास आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही अनेक ठिकाणी सुरू झाले आहे, परंतु एका अहवालानुसार, चित्रपटाने रिलीजपूर्वीच २५० कोटी रुपये कमावले आहेत. लोकेश कनागराज दिग्दर्शित या चित्रपटात तुम्हाला जबरदस्त अॅक्शन आणि स्वॅग पाहायला मिळेल.

रिलीजपूर्वीच इतके कोटी कमावले?

पिंकव्हिलाच्या अहवालानुसार, सुमारे ३७५ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने त्याचे डिजिटल, संगीत आणि सॅटेलाइट हक्क विकून जवळपास २५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय हक्क ६८ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. कमाईच्या आधारे, 'कुली' रिलीजपूर्वीच आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा तमिळ चित्रपट बनला आहे. सॅकॅनिल्कच्या वृत्तानुसार, कुलीने आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगद्वारे ३० कोटी रुपये कमावले आहेत.

'लिओ'चा कमाईचा विक्रम तो मोडू शकेल का?

कमाईच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लिओ' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता 'कुली' हा विक्रम मोडू शकेल का हे पाहायचे आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून केरळ आणि कर्नाटकातील काही चित्रपटगृहांमध्ये सुरू होईल. तथापि, तामिळनाडूमध्ये प्रेक्षकांना सकाळी ९ वाजल्यापासून पहिला शो पाहता येईल. तेथील स्थानिक नियमांमुळे हे केले जात आहे.

कलाकार

चित्रपटाचा प्लस पॉईंट म्हणजे त्याची स्टारकास्ट. ज्यामध्ये रजनीकांत (तामिळ), नागार्जुन (तेलुगू), उपेंद्र (कन्नड), सौबिन शाहीर (मल्याळम) आणि आमिर खान (हिंदी) हे सर्व वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधील कलाकार आहेत. श्रुती हासन देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : बैठ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, शेतीवाडीचे कामे मार्गी लागतील; ५ राशींच्या लोकांना उत्तम धनयोग

Shravana Nakshatra : मकर राशीवर श्रवण नक्षत्राचा शनीप्रभाव, मेहनतींसाठी यशाची चाहूल; आरोग्याची काळजी घ्या

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

SCROLL FOR NEXT