Dhanush-Aishwarya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhanush-Aishwarya : रजनीकांत यांच्या लेकीचा संसार मोडला! धनुष अन् ऐश्वर्याच्या १८ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम

Dhanush-Aishwarya Divorce: साउथ स्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि धनुषचा अखेर घटस्फोट झाला. न्यायालयातून यांच्या घटस्फोटाला मान्यता मिळाली आहे.

Shreya Maskar

साउथ स्टार रजनीकांत यांच्या लेकीचा म्हणजे ऐश्वर्याचा अखेर अभिनेता धनुषसोबत (Dhanush) घटस्फोट झाला आहे. यांच्या घटस्फोटाला न्यायालयातून मान्यता मिळाली आहे. आता धनुष आणि ऐश्वर्याचा (Aishwarya ) 18 वर्षांचा संसार मोडला आहे. ऐश्वर्या आणि धनुषला दोन मुलं देखील आहेत. यात्रा आणि लिंगा ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ही निर्माती आहे. ऐश्वर्या आणि धनुषने 2022मध्ये घटस्फोटाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना दिली. आता यांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने यांचा घटस्फोट मंजूर केला. त्यांचा घटस्फोट बुधवारी २७ नोव्हेंबरला झाला.

साउथ अभिनेता धनुष आणि निर्माती ऐश्वर्या यांचा लग्नसोहळा 2004 मध्ये पार पडला होता. या दोघांची पहिली भेट चित्रपटाचा एका कार्यक्रमाला झाली. साउथ अभिनेता धनुष आणि निर्माती ऐश्वर्या यांचा लग्नसोहळा 2004मध्ये पार पडला होता. या दोघांची पहिली भेट चित्रपटाचा एका कार्यक्रमाला झाली. हा कार्यक्रम चित्रपट 'कादल कोंडेन' हा होता.

चित्रपटाच्या इंटर्व्हल झाल्यावर हे दोघे एकमेकांना भेटले. त्यानंतर ऐश्वर्याने दुसऱ्या दिवशी धनुषला एक पुस्तक पाठवून त्याचे कौतुक केले. तेव्हा पासून आम्ही दोघ बोलायला लागलो. असे एका मिडिया मुलाखतीत धनुषने सांगितले होते. ऐश्वर्या आणि धनुषमध्ये दोन वर्षांचे अंतर आहे. ऐश्वर्या धनुषपेक्षा मोठी आहे. यांचा लग्नसोहळा रजनीकांत यांच्याच घरी पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT