Rajesh Khanna Birth Anniversary Unknown Facts About Superstar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajesh Khanna Birth Anniversary: बॉलिवूड सुपरस्टार ते राजकारणी; १५ हिट चित्रपट देणाऱ्या राजेश खन्नाची अशी आहे करिअरची स्टोरी

Chetan Bodke

Rajesh Khanna Birth Anniversary Unknown Facts About Superstar

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्मदिवस. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख होती. आजही त्यांची ती ओळख कायम आहे.

राजेश यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत १८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातल्या १२८ चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीमध्ये, १९६९ ते १९७१ च्या काळात राजेश खन्ना यांनी एकाचवेळी जवळपास १५ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळख मिळाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...

  • राजेश खन्ना यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत एकूण १८० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यातले १६३ चित्रपट फिचर फिल्म म्हणून होते. तर त्यातल्या जवळपास १२८ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका, २२ चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका आणि १७ छोट्या- मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीमध्ये १९६९ ते १९७१ च्या काळात एकाचवेळी राजेश खन्ना यांनी जवळपास १५ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळख मिळाली.

  • राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी १४ वेळा फिल्मफेअरचं नॉमिनेशन मिळालं असून तीनवेळा त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय.

  • बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी राजेश यांना २५ वेळा नामांकन मिळाले असून त्यातील चार वेळा त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे.

  • राजेश नेहमीच शुटिंगला उशिरा पोहोचायचे, त्यामुळे त्यांच्यावर दिग्दर्शक नाराज व्हायचे. राजेश नेहमीच शुटिंगसाठी उशिरा येत असल्यामुळे बिग बींनीही त्यांची खिल्ली उडवली होती.

  • अभिनयानंतर राजेश यांनी १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या तिकिटावर राजेश यांनी १९९१ ते १९९६ या काळात दिल्ली लोकसभेसाठी खासदार म्हणून राजेश खन्ना यांनी काम केलं. त्यानंतर राजकारणातून त्यांनी संन्यास घेतला.

राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. मात्र, तरीही ते नेहमी आपल्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या स्मरणार्थ आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT