अभिनेत्री 'गहना वशिष्ठचा' मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; वाचा सविस्तर  Instagram
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री 'गहना वशिष्ठचा' मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; वाचा सविस्तर

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) रोज नवनविन खुलासे समोर येत आहेत.

वृत्तसंस्था

मुंबई: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) रोज नवनविन खुलासे समोर येत आहेत. त्यातबरोबर राजच्या कोठडीत चौदा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकारणात अभिनेत्री गहना वशिष्ठचं (Gehana Vasisth) नाव देखील गोवलं गेलं आहे. तिच्यावर राज कुंद्रा सोबत पॉर्नोग्राफी प्रकरणाबाबत आरोप आहेत. परंतू गहानाने आता मुंबई पोलिसांनाच (Mumbai Police) या गोष्टीसाठी जबाबदार धरलं आहे. ती आरोप करताना म्हणाली की ''मुंबई पोलीस राज कुंद्रा आणि एकता कपुर यांच नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाब टाकत आहेत''.

गहनाने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. "माझ्यावर पोलीस अत्यंत बेधुट आरोप करत आहेत. फ्रेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी माझ्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. आणि मला अटक केली होती. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून 15 लाखांची मागणी केली होती. आणि मी जर त्यांना पैसे दिले तर ते मला सोडून देतील असेही ते म्हणाले होते.परंतू मी पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर राज आणि एकता कपुर यांचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. पण मी दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे मला अटक करण्यात आली. राज कुंद्राने देखील चुकीचं असं काहीच केलेलं नाही. पोलीस उगाच आम्हाला नको त्या प्रकरणामध्ये अडकवत आहेत'', असेही गहना बोलली आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा लंडमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी पॅार्न व्हिडिओंची निर्मीती करायचा. आणि हिच कंपनी हॅाटशॅाट नावाने भारतामध्ये अॅप चालवते. समोर आलेल्या माहितीनुसार या अॅपवर OTT प्लॅटफॅार्मसारखे मंथली सबस्क्रिप्शन मिळत नाही. हे चित्रपट पाहण्यासाठी लोकांना प्रत्येक चित्रपटासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. माध्यामाच्या अहवालानुसार राज कुंद्राने या पॅार्न व्हिडीओच्या माध्यमांतून जवळपास 500 कोटी रुपये कमावले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT