राज कुंद्राच्या कोठडीत वाढ, तर शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा saam tv news
मनोरंजन बातम्या

राज कुंद्राच्या कोठडीत वाढ, तर शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography cases) व्यावसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर, रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज कुंद्राच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. मागील सुनावणी दरम्यान राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीतही राज कुंद्राच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

पॉर्नोग्राफी प्रकरण समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्याविरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्याचबरोबर अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी देखील त्याच्या कोठडी मागितली आहे.

राज कुंद्राच्या न्यायलयीन कोठडीत वाढ करण्यात आली असली तरी याच प्रकरणातील शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडनं तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. अटकेच्या भितीनं मर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या अभिनेत्रींची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. या दोघींना गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

गुन्हे शाखेने 23 जुलै रोजी शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी शिल्पा शेट्टींची याच घरात सुमारे 6 तास चौकशी केली. राजनंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलीसांच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी जेव्हा पोलीस शिल्पा आणि राजच्या घरी गेले होते तेव्हादेखील दोघांमध्ये जोराचे भांडणे झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्राला पोलीस त्याच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा, तू घराची, कुटुंबाची बदनामी केलीस, असं करण्याची काय गरज होती, असे म्हणत दोघांमध्ये चांगलेच वाद झाले. यावेळी राज तिला आपण निरपराध असल्याचं वारंवार सांगत होता.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT