पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी राज कुंद्राचे पाच  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी राज कुंद्राचे पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप Saam Tv
मनोरंजन बातम्या

पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी राज कुंद्राचे पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सूरज सावंत

मुंबई - पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणाऱ्या रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात सोमवारी रात्री उशिरा उद्योगपती व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातमुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

दरम्यान या पॉर्न फिल्म्स प्रकरणी राज कुंद्रासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. रायन जॉर्न थाँर्प असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी वेरूळचा राहणारा आहे. मालवणी पोलीस ठाण्यात  रायन जॉर्न थाँर्प विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

हे देखील पहा -

राज कुंद्राने या सर्व रँकेटचा व्यवहार करण्यासाठी एच अकाउंट्स या नावाने ५ जणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला होता. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये  राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्ट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

या चॅटमध्ये या व्हिडिओतून कमावलेल्या पैशांचा आकडा देखील समोर आला आहे. त्यात टोटल ऑर्डर १४३३, टोटल कॉइन्स ३ लाख ३२ हजार ४८३,टोटल सेल ४  लाख ४० हजार ३६३ आणि एमटीडीसी सेल २७ लाख ८१ हजार ५५१ असा हिशोब मांडण्यात आला असून कुंद्रा यांचं लोकांशी चॅट केलेला पुरावा पोलिसांच्या हाती लागले आहे.  

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती प्राँपर्टी सेलच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना चित्रपटात मोठे काम देतो, असे सांगून अश्लील व्हिडीओमध्ये काम करून घेण्यात येत होते. पोलिसांनी या रॅकेटमधून २ मुलींची सुटका केली आहे.मुलींना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाही, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT