Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection: भारत-पाकिस्तान तणावात 'रेड २' चा धुमाकूळ; आठव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

Raid 2 Box Office Collection Day 8: 'रेड 2' या अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आठ दिवसात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shruti Vilas Kadam

Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' या अजय देवगणच्या प्रमुख भूमिकेतील चित्रपटाने 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला, ज्यात भारतातील आणि जगभरातील कमाईचा समावेश आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

'रेड 2' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' चित्रपटाची पुढील कथा आहे. या भागात आयआरएस अधिकारी अमय पटनायक दादाभाई या भ्रष्ट राजकारण्याविरुद्ध 75 वी रेड टाकताना दिसणारा आहे. चित्रपटात भ्रष्टाचार, राजकीय सत्तेचा गैरवापर आणि करचोरी यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या मते, अजय देवगणच्या रेड २ ने परदेशात फक्त आठ दिवसांत सुमारे १७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर, रेड २ने भारतात ५.६१ कोटींचा गल्ला केला आहे. भारतीय एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, एकूण ९५.६५ कोटींची कमाई केली आहे तर जागतिक स्तरावर आतापर्यंत ११५ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

'रेड 2' च्या यशामुळे अजय देवगणच्या कारकिर्दीत आणखी एक यशस्वी चित्रपट जोडला गेला आहे. चित्रपटाच्या शेवटी 'रेड 3' ची हिंट देण्यात आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये सामाजिक विषयांवर आधारित थ्रिलर चित्रपटांची परंपरा कायम ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT