Shruti Kadam
महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टल वर जा आणि नवीन वापरकर्ता म्हणून स्वत:ची नोंदणी करा. यासाठी आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक आहे.
नोंदणीनंतर पोर्टलवर लॉगिन करा आणि 'राजस्व विभाग' अंतर्गत "जात प्रमाणपत्र" ही सेवा निवडा.
प्रमाणपत्रासाठी आवश्यक माहिती अचूकपणे भरा – नाव, जन्मतारीख, जात, उपजात, पत्ता इ. तसेच कोणत्या कारणासाठी जात प्रमाणपत्र हवे आहे, तेही नमूद करा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, जसे की,आधार कार्ड,रहिवासी पुरावा, जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला, पालकांचे जात प्रमाणपत्र
संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करा. सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाचा एक acknowledgment / पावती नंबर मिळेल.
आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून "अर्जाची स्थिती" तपासू शकता. अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सामान्यतः १०-१५ दिवस लागतात.
अर्ज मंजूर झाल्यानंतर पोर्टलवरून जात प्रमाणपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करता येते. हे प्रमाणपत्र विविध शासकीय/शैक्षणिक वापरासाठी वैध असते.