Shruti Kadam
भारतीय हवाई दलासाठी १०वी, १२वी किंवा पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक असते, भरतीच्या शाखेनुसार पात्रता बदलते. एअरमन पदासाठी १२वी पास किंवा डिप्लोमा आवश्यक, तर अधिकारी पदासाठी पदवी/इंजिनीअरिंग डिग्री लागते.
Airmen (Group X आणि Y): तांत्रिक व अन्य कामांसाठी, Officers (AFCAT, NDA, CDS मार्गे): पायलट, ग्राउंड ड्यूटी व तांत्रिक अधिकारी पदांसाठी.
NDA (राष्ट्रीय संरक्षण अकादमी)मध्ये १२वी नंतर किंवा UPSC करुन प्रवेश घेता येतो. CDS (कॉम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस): पदवीनंतर प्रवेश घेता येतो. AFCAT (एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट) अधिकारी पदासाठी विशेष परीक्षा असतात.
धावणे, पुश-अप्स, सिट-अप्स, स्क्वॅट्स यांसारख्या शारीरिक चाचण्या. उंची, वजन व दृष्टीची विशिष्ट मर्यादा असते.
संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येते. उंची, वजन, रक्तदाब, श्रवणशक्ती, दृष्टी, मेंदूचे कार्य इत्यादींची तपासणी होते.
NDA/CDS/AFCAT मध्ये लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर SSB (Service Selection Board) मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीत मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व वैयक्तिक मुलाखत असते.
निवड झाल्यानंतर NDA, AFA (Air Force Academy) किंवा इतर प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यशस्वी प्रशिक्षणानंतर संबंधित शाखांमध्ये नेमणूक केली जाते.