'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बजेट वसूल केले आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'रेड 2' चित्रपटात अजय देवगण ( Ajay Devgn ) आणि रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh ) वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे.
अजय देवगण आणि रितेश देशमुखचा 'रेड 2' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता सहा दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत 'रेड 2'ने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय (Raid 2 Box Office Collection Day 6 ) केला जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 19.25 कोटी
दिवस दुसरा - 12 कोटी
दिवस तिसरा - 18 कोटी
दिवस चौथा - 22 कोटी
दिवस पाचवा - 7.50 कोटी
दिवस सहावा - 6.75 कोटी
एकूण - 85.50 कोटी
बॉक्स ऑफिसवर सध्या चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. 'रेड 2', 'केसरी 2', 'जाट' आणि 'ग्राउंड झिरो' हे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र आता अजय देवगणच्या 'रेड 2'ने अक्षय कुमारच्या 'केसरी 2'ला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 'केसरी 2'नं 82.10 कोटींचा व्यवसाय केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.