Rahul Gandhi Watch Phule Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phule Movie: राहुल गांधी फुले चित्रपट पाहून झाले भावुक; फोटो शेअर करत म्हणाले, 'आजही आपल्या समाज आणि देशाला...'

Rahul Gandhi Watch Phule Movie: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच 'फुले' हा चित्रपट पाहिला हा चित्रपट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.

Shruti Kadam

Rahul Gandhi Watch Phule Movie: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच 'फुले' हा चित्रपट पाहिला हा चित्रपट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. राहुल गांधी यांनी बिहारच्या पटणा येथील इनॉक्स मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, "बिहार दौऱ्यात आज पटणा येथील इनॉक्स मॉलमध्ये प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्यांसह 'फुले' चित्रपट पाहून भावुक झालो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन आजही आपल्या समाज आणि देशाला मार्गदर्शन करत आहे."

'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही वाद निर्माण झाले होते. चित्रपटावर आरोप करण्यात आला होता की, त्यामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती दर्शवली आहे. या कारणास्तव, सेंसर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये जातिव्यवस्थेवरील व्हॉइसओव्हर काढून टाकणे आणि काही संवाद व दृश्यांमध्ये बदल करण्याचा समावेश होता.

राहुल गांधी यांच्या या चित्रपट पाहण्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले करत ते सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर विचार आणि एकात्मता ठेवत असल्याचे बोलले जात आहे. तर, काहींनी त्यांना ट्रोल करत, त्यांनी झोपडपट्टी सारख्या भागात जाऊन प्रत्यक्ष जीवन पाहणे अधिक उपयुक्त ठरले असते बोलले जात आहे.

'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, त्याला समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही समीक्षकांनी चित्रपटाच्या विषयवस्तूचे कौतुक केले आहे, तर काहींनी पटकथेच्या सादरीकरणावर टीका केली आहे. तथापि, चित्रपटाने ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणा कार्याला उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT