Raghav-Parineeti Engagement News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raghav-Parineeti Engagement News: राघव चड्ढा यांनी अखेर मौन सोडले, म्हणतात ‘सेलिब्रेशनची संधी मिळेल पण...’

लग्न आणि अफेअरच्या चर्चांवर परिणीतीने अद्यापही मौन बाळगले असले तरी, राघव चड्ढांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच राघव त्यांच्या लग्नावर अप्रत्यक्ष बोलताना दिसले.

Chetan Bodke

Raghav-Parineeti Engagement News: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. जरी या जोडप्याने त्यांच्यातील नाते अधिकृत जाहीर केले नसले तरी, पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू सोबत आप खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करून या जोडप्याचे अभिनंदन केले होते. लग्न आणि अफेअरच्या चर्चांवर परिणीतीने अद्यापही मौन बाळगले असले तरी, राघव चड्ढांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच राघव त्यांच्या लग्नावर अप्रत्यक्ष बोलताना दिसले.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याची चर्चा जोरदार सुरु असून एकीकडे त्यांच्या साखरपुड्याची तारीखेची सुद्धा चर्चा झाली होती, पण त्या चर्चा सर्वच फेल ठरल्या. यांच्या नात्याची चर्चा जोरात सुरु असताना परिणीती आणि राघव चढ्ढा एप्रिल महिन्यातच आपला साखरपुडा उरकणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत.

ही जोडी १० एप्रिलला साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती, पण तसं काही झालं नाही. आता ही जोडी लग्न कधी करणार यावर सर्वांनाच प्रश्न पडला आहे. अशातच पुन्हा एकदा राघव चड्ढा यांनी आपल्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, आपचे खासदार राघव चड्ढा यांना लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ‘तुम्हाला सेलिब्रेशनची संधी मिळेल.’ अशी राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोघांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकते, असा अंदाज सध्या सोशल मीडियावर लावला जात आहे.

परिणीती आणि राघवच्या डेटींगच्या अफवा समोर आल्या, त्यावेळी हे कपल सलग दोन दिवस मुंबईत लंच आणि डिनर डेटवर दिसले होते. यानंतर दोघेही अनेकदा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले. अलीकडेच राघवही अभिनेत्रीला रिसीव्ह करण्यासाठी दिल्ली विमानतळावर दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Health : सकाळी उठल्यावर तोंडाला कडू चव का येते? फक्त रात्रीचे जेवणच नाही, तर लपली आहेत 'ही' ५ कारणेही

राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणात निर्दोष मुक्तता; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Breast cancer: ग्रामीण भागातील महिलांनो, स्तनात होणारे बदल दुर्लक्षित करू नका! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra News Live Update: वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

November Travel : थंडी सुरू होण्याआधी करा ट्रिप प्लान, नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी भारतातील ५ सुंदर ठिकाणं

SCROLL FOR NEXT